शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणावर ठरतो मुलाचा चिडचिडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:31 IST

मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता एखाद्या मुलाची चिडचिड होणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असते. हे अस्वास्थ्य अनेक कारणांमुळे असू शकते.घरगुती वातावरण : घरातील वातावरण कसे आहे? यावरही मुलांचा चिडचिडपणा अवलंबून असतो. घरात वादविवाद सतत चालू असतील. मोठ्यांचे एकमेकांसोबत वारंवार खटके उडत असतील, कोणाचे दीर्घकालीन आजारपण चालू असेल तर त्याचा परिणाम मुला-मुलीच्या चिडचिडपणात ...

मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता एखाद्या मुलाची चिडचिड होणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असते. हे अस्वास्थ्य अनेक कारणांमुळे असू शकते.घरगुती वातावरण : घरातील वातावरण कसे आहे? यावरही मुलांचा चिडचिडपणा अवलंबून असतो. घरात वादविवाद सतत चालू असतील. मोठ्यांचे एकमेकांसोबत वारंवार खटके उडत असतील, कोणाचे दीर्घकालीन आजारपण चालू असेल तर त्याचा परिणाम मुला-मुलीच्या चिडचिडपणात झालेला पाहायला मिळतो.आई-वडिलांचे परस्पर संबंध : आई-वडिलांचे परस्पर संबंध हे ताणलेले असतील, आईवडील विभक्त राहत असतील वा त्यांच्यात सतत वादविवाद होत असतील तर त्याचा विपरीत परिणाम म्हणून मुले चिडचिडी होऊ लागतात.सततचे आजारपण : काही मुलांचे सतत हे ना ते दुखत असते किंवा एखादा दीर्घकालीन आजार मागे लागलेला असतो. त्यामुळे सारखे दवाखाने व उपचार चालू असतात. त्यामुळे मुले कंटाळून जातात व चिडचिड करू लागतात.समायोजन समस्या : काही मुलांना परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते. याच्याशी पटत नाही, त्याच्याशी जुळत नाही, हा चांगला नाही, तोही चांगला नाही असा प्रकार चाललेला असतो. मूळ समस्या मुलाच्या व्यक्तीत्वात कुठेतरी दडलेली असते. त्यामुळे समायोजनाची समस्या उत्पन्न होऊन मुले चिडचिडी बनतात.मानसशास्त्रीय समस्या : काही मुलांमध्ये चिंता, उदासीनता यासारख्या मनोवैज्ञानिक समस्या निर्माण झालेल्या असतात. कधी कधी तर तीव्र मनोविकार उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे मुले चिडचिडी बनलेली असतात.याशिवाय मुलाचे व्यक्तीत्व, अभिवृत्ती, स्वभाव व वरील यादीत समाविष्ट नसलेल्या पण व्यक्तिगत दृष्टीने महत्त्वाच्या घटना वा गोष्टी त्याच्या चिडचिडपणाच्या मुळाशी असू शकतात.पालकांनी या सर्व बाबी ध्यानात घेऊन स्वत:च्या वागण्यात काही बदल करणे हितावह ठरते. घरातील वातावरणावरही अवलंबून असतो मुलांचा चिडचिडपणा.आई-वडिलांच्या परस्पर संबंधांचा मुलांच्या वागण्यावर, चिडचिडपणावरही परिणाम होत असतो.आपण बघतो काही मुलांचे हे आजारपण. कधी ते आजारपण यावरदेखील मुलाचा चिडचिडपणा अवलंवून असतो.काही मुलांना त्याच्या परिसरातील परिस्थितीशी जुळवून घेणे खूप कठीण जात असते.काही मुलांमध्ये चिंता आणि उदासीनता या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. यावरदेखील चिडचिडपणा अवलंबून असतो.मुलाच्या चिडचिडपणावर वारंवार भाष्य करणे टाळावे.मुलावर चिडकाच असल्याचा शिक्का मारू नये.मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.आपले काही चुकतेय का ते तपासावे.मुलातील चिडचिडपणा वाढून पक्का होणार नाही यासाठी स्वत:त बदल करावे.गरज असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.या बाबींचा खुबीने वापर केला तर मुलाचा चिडचिडपणा नियंत्रणात आणता येतो. (उत्तरार्ध)- डॉ. नीरज देव

टॅग्स :Jalgaonजळगाव