शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:17 IST

शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच

जळगाव : शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच असून बांभोरी प्र.चा. येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे नऊ ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले तर दोन ट्रॅक्टर चालकांनी पळवून नेले. यानंतर दोन दिवसात पुन्हा दापोरा येथूनही महसूल पथकाच्या ताब्यातून चालकाने वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले.वाळू लिलावामध्ये गटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनीच बांभोरी नजीकच्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार धरणगाव तहसील कार्यालयात केली होती. सोबतच परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी होत्या. त्यानुसार गुरुवार, १८ जुलै रोजी सकाळी सात वाजताच महसून पथकाने बांभोरी, ता. धरणगाव येथील सिद्धी विनायक नगर शेजारी गिरणा नदी पात्रात पोहचले असता तेथे ११ ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. महसूलचे पथक नदी पात्रात पोहचताच त्यांना पाहून चालकांनी एम.एच. १९, एएन - १९६२ व एमएच. १९, पी. ०३९२ हे दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. उर्वरित ९ ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेतले. त्या सर्वांचा पचंनामा करून ते धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. वाळू वाहतूकदार वाहने पळवून नेत असल्याच्या घटना पाहता जळगावातून दंगा नियंत्रण पथक नदीपात्रात पाठवावे लागले. त्या वेळी पोलीस बंदोबस्तामुळे वाळू चोरट्यांना कोणताही विरोध करता आला नाही. तरीदेखील दोन ट्रॅक्टरचालकांनी दोन ट्रॅक्टर पळवून नेले. अवैध वाळू उपशाची तीन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. या पूर्वी १ जुलै रोजी विदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाऱ्या ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. त्या वेळी कारवाई करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी वाळू उपसा करणाºयांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले होते. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले होते. आता पुन्हा २० रोजी दापोरा येथे ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव