शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध उपसा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:13 IST

जामनेर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणाच्या बॅक वॉटरमधून वीज पंप लावून सर्रास पाण्याचा दिवसाढवळ्या उपसा सुरू असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याने पाणी टंचाईची भिती कायम आहे.

ठळक मुद्देपाऊस कमी झालेला असतांनाही पाण्याची पळवापळवीसंभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय योजन्याची मागणी

जामनेर : शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेत पालिकेने पाणी कपातीला सुरुवात केलेली असली तरी धरणातील बॅक वॉटरमधून वीज पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरुच असल्याचे दिसत आहे. पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यंदा सरासरीच्या केवळ ५५ टक्के इतकाच पाऊस झाला. परिणामी तालुक्यातील धरण, पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण भरलेले आहेत. कांग, वाघुर व सूर या नद्यांना मोठे पूर न गेल्याने वाघुर धरणातील पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत एकमेव कांग प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा असून तोंडापुर मध्यम प्रकल्पात फक्त २० टक्के साठा आहे. जुन अखेर पर्यंत तालुक्यात दहा गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. आॅगष्टमध्ये झालेल्या पावसाने टँकरची संख्या कमी झाली. सध्या टँकर नसले तरी पुढील महिन्यात ग्रामिण भागात पाणी टंचाईची तिव्रता वाढू शकते.तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक, खादगांव, हिंगणे, गंगापुरी, गारखेडे, शिंगाईत, मांडवे, चिंचखेडे, नेरी आदी बुडीत क्षेत्रातील पाण्ी साठ्यातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेवुन संबंधीत विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी