शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:57 IST

समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.

ठळक मुद्देमेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली मेळाव्याला उपस्थिती

भुसावळ : समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.ते येथील संतोषीमाता सभागृहात रविवारी आयोजित अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश पाटील होते. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जळगावच्या महापौर स्मिता भोळे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी आमदार शिरीष चौधरी, ‘मसाका’ चेअरमन शरद महाजन, पं.स.सभापती प्रीती पाटील, महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, दिनेश भंगाळे, नगरसेवक मुकेश पाटील, अमोल इंगळे, परीक्षित बºहाटे, बंडू भोळे, डॉ.प्रशांत फालक, सुहास चौधरी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेश पाटील यांनी मोबाइलचा संवाद सुलभतेसाठी आहे. त्याच्या वापराने आपल्या जीवनात समस्या उत्पन्न होणार नाही याची काळजी आई-वडील व मुलांनी घ्यावी. विवाह जोडताना कुंडलीतील गुणांपेक्षा जोडीदाराचे गुण बघून विवाह जोडण्याचे आवाहन केले. आपला जोडीदार निवडताना आई-वडिलांना विश्वासात घ्या, असा सल्ला नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिला.कार्यक्रमात एक हजार विवाह इच्छुकांच्या सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी तर आभार शहराध्यक्ष देवा वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, नीलेश राणे, नीरज किरंगे, राहुल नेमाडे, अमोल इंगळे, पवन फालक, संकल्प वाणी, विनय चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ