कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांनी मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्यासह उपस्थित प्रशासकीय मंडळाचे स्वागत केले. यावेळी बोलताना दिलीप वाघ यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने, तसेच व्यापारी वर्गालादेखील न्याय देण्याची भूमिका प्रशासकीय मंडळाची असेल आणि बाजार समितीच्या सर्व शाखांमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे सांगताना महाविकास आघाडीच्या सर्व पक्षप्रमुखांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अभय पाटील, प्रा. एस. डी. पाटील, रणजित पाटील, चंद्रकांत धनवडे, युवराज पाटील व अनिल महाजन यांनीदेखील प्रशासक म्हणून सूत्र स्वीकारली. यावेळी गटनेते संजय वाघ, शेतकी संघ अध्यक्ष सुनील विठ्ठल पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी भोसले, माजी सभापती इस्माईल शेठ, माजी सभापती दगाजीराव वाघ, शेतकी संघाचे माजी चेअरमन दिगंबर पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विजू पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, नगरसेवक वासुदेव महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, सुरेश देवरे, शामकांत भोसले, सुदर्शन सोनवणे, प्रकाश निकुंभ, प्रकाश पाटील, सुनील पाटील, प्रा. प्रदीप वाघ, विनय जकातदार, दत्ता पाटील, सतीश चौधरी, अविनाश सुतार, अजय अहिरे, हारुण देशमुख, संजय पाटील, प्रकाश एकनाथ पाटील यांच्यासह सर्व व्यापारी, हमाल मापाडी सर्व संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व महविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.