शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 15:52 IST

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील ३३ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा२१ गावांना विहीर अधिग्रहणगुरांचे होताहेत हालस्वतंत्र टँकरची मागणीसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र गुरांना पाणी अपूर्ण पडू लागल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वाढीव टँकरची मागणी केली आहे.अमळनेर तालुक्यात अटाळे, पिंपळे बद्रूक, पिंपळे खुर्द, वाघोदा, निसर्डी, अंचलवाडी, डांगर बुद्रूक, भोरटेक मालपूर, धानोरा सबगव्हाण, शिरसाळे, झाडी, गलवाडे बुद्रूक, गलवाडे खुर्द, जैतपीर, खेडी, खरदे, वासरे, गडखांब, पिंपळी प्र.ज., आर्डी, अनोरे, भरवस, लोणपंचम, इंद्रापिंप्री, जानवे, धुपी, मांजर्डी, नगाव बुद्रूक, सुंदरपट्टी या गावांना पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर सुरू आहेत. या गावांसाठी सध्या अमळनेर पालिकेच्या मालकीच्या सिंधी कॉलनी भागातील विहिरीवरून व तापी नदी काठावरील धावडे या दोन गावनवरून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासह अजून २१ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.अमळनेर, कळमसरे, करणखेडा, ढेकूसीम, दहिवद खुर्द, रढावण राजोरे, सोनखेडी, तळवाडे, कुºहे बुद्रूक, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, एकतास, लोंढवे, पाडसे, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुद्रूक, नंदगाव, लाडगाव, खवशी, एकरुखी, लोण, चारम तांडा आदी गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र दररोज जमिनीची पाणी पातळी खालावत चालली असल्याने प्रस्तावांची संख्या वाढत आहे. खेडी प्र. ज. व शिरूड या दोन गावांचेही टँकर प्रस्ताव आलेले आहेत. काही गावांना गुरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.तरवाडे येथे विहीर अधिग्रहणाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र गुरांसाठी स्वतंत्र टँकर मागतो, प्रशासन देत नाही. माणसे व गुरांसाठी तीन टँकर घेऊन विहीर अधिग्रहण बंद करा, असे सांगतात. मात्र अमळनेरचे पाणी पिण्यायोग्य नाही.-रामकृष्ण पाटील, सरपंच, तरवाडे, ता.अमळनेरसुंदरपट्टी येथे अद्याप टँकर सुरू झालेले नाही. परिसरातून नागरिक पाणी आणत आहेत. गोशाळेतर्फे गुरांसाठी दररोज पाच हजार लीटरचे टँकर येत आहे.-सुरेश पाटील, सुंदरपट्टी, अमळनेरनगाव बुद्रूक येथे मागील वेळी झालेल्या बंधारे व जलयुक्तची कामे केल्याने चिखली नदीत पाणी अडवण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी शेतीसाठी त्याचा उपसा केल्याने पाणी साठा संपला, अन्यथा ते पाणी किमान मेपर्यंत पुरले असते. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने उपसा थांबवण्यात येऊ शकला नाही.-महेश पाटील, नगावसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा होत आहे. मात्र तापीचे आवर्तन सुटल्यास जळोद येथून व पांझरेतून आवर्तन सोडल्यास भिलाली, एकलहरे, कलंबू, बोदडे आदी ठिकाणाहून टँकर भरले जातील.-अजयकुमार नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर