शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

वडिलांनी दिली लिहिण्याची प्रेरणा

By admin | Updated: May 18, 2017 11:18 IST

यातून शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - शाळेमध्ये असताना वडील दररोज सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारायचे. कधी नवीन घडामोडीसंदर्भात माहिती सांगायचे. यातून शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे  विविध विषयांवरील वाचन करीत होते. तेव्हा त्या वाचन अनुभवातून नकळतपणे हातात लेखणी आली. प्रथम स्त्रियांच्या अडचणी, त्यांचे दैनदिन जीवन, त्यांची व्रतवैकल्ये, त्यांचे स्वत:चे विश्व यासंदर्भात लहान लहान लेख लिहिले. एकदा  यजमानांनी उत्सुकता म्हणून एक लेख वाचला आणि क्षणाचाही विलंब न लावता तो लेख वर्तमानपत्राला पाठवून इतर वाचकासाठी उपलब्ध करून द्यावा, असा केवळ सल्ला दिला नाही तर स्वत: तो लेख वर्तमानपत्राकडे पाठविला आणि 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून 14 वर्षापूर्वी तो प्रसिद्ध झाला. ‘कोण म्हणे तू अबला नारी, रूप दुर्गेचे तुङया उरी’ हा लेख वाचून गृहिणीपासून तर नोकरी करणा:या भगिनीर्पयत सर्वानी फोन करून कौतुक तर केलेच आणि तुम्ही खूप छान लिहितात. असेच लेखन पुढेही करत राहा, अशी प्रेरणाही दिली आणि ख:या अर्थाने लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध विषयांवर लिखाण सुरू झाले. त्यामध्ये जनरेशन गॅप, सुखी व समृद्ध जीवनाचे टॉनिक, हास्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, तणावमुक्त जीवन कसे जगावे, स्त्रियांचे सामाजिक स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबील, राष्ट्रीय एकात्मता असे विविध विषय मनात डोकावले. विचार पक्का झाला आणि लेखणी फिरू लागली, ती आजतागायत सुरू आहे. लेखन वाचून गुरू ब.बी. पंडित यांनी माङयातल्या लेखिकेला ओळखले आणि म्हणाले, ‘सारखे वैचारिक खाद्य भावी शिक्षकांना पुरविले तर अधिक सक्षम आणि समृद्ध सामाजिक अभियंते घडविता येतील. विचार कर.’ सरांच्या या प्रेरक शब्दांमुळे लिखाणाचा विचार पक्का केला आणि सरांबरोबर व मार्गदर्शनाखाली उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक या बी.एड. अभ्यासक्रमाच्या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला. या प्रथम पुस्तकाचे अभ्यासू विद्याथ्र्यानी इतके जोरदार स्वागत केले की, तीन वर्षात पुस्तकाच्या चार आवृत्ती निघाल्या  आणि बघता बघता एक साधी प्राध्यापिकेने 12 पुस्तके लिहिली. लेखनाची ही आवड आता जणू सवयच झाली आहे.- प्रा. डॉ. लता मोरे