शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबार्इंच्या कविता व जात्यावरच्या ओव्यांची प्रेरणा - कवी इंद्रजित भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:32 IST

जळगावात साहित्य अकादमीतर्फे ‘कवी संधी’ कार्यक्रम

ठळक मुद्देजात्यावरच्या हजारो ओव्या तोंडपाठतत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे

जळगाव : बहिणाबाई चौधरी यांच्या समग्र कविता, जात्यावरच्या ओव्या, महानुभाव पंथीय आणि कृषी संस्कृती हे आपल्या आयुष्याच्या संस्काराचे सूत्र असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी शनिवारी साहित्य अकादमीतर्फे झालेल्या कवी संधी कार्यक्रमाप्रसंगी केले.व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहात संध्याकाळी पुस्तक प्रदर्शन व कवी संधी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह उर्दू भाषेचे अभ्यासक मोईनोद्दीन उस्मानी, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.जात्यावरच्या हजारो ओव्या तोंडपाठबहिणाबाई यांच्या समग्र कवितांची जशी प्रेरणा होती तशी जात्यावरच्या ओव्यांची प्रचंड आवड होती. लोकसंस्कृती हा विषय शिकविणारे प्रभाकर मांडे सरांनी तोंडपाठ असलेल्या जात्यावरच्या ओव्या लिहून काढण्यास सांगितल्या.ज्येष्ठ कवी महानोर व आपली प्रकृती एक नाहीअनेक कवींनी मला आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मला ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांच्या कविता प्रचंड आवडत होत्या. नंतर मात्र लक्षात आले की त्यांची आणि माझ्या कवितेची प्रकृती एक नाही. यासोबत कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण मला खूप आवडायचे.तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजेनंतरच्या काळात माझी कविता ही शेतकरी आणि महात्मा फुले यांच्या कार्यावर केंद्रीत राहिली.पण हे सारे करीत असताना आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला आव्हान देता आले पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे काही कालांतराने माझे मत बदलत गेल्याचे त्यांनी सांगितले.कवितांची प्रेरणा मिळाली जळगावातूनइंद्रजित भालेराव म्हणाले, कविता लेखनाची खरी प्रेरणा आपल्याला जळगावातून मिळाली. शालेय जीवनात असताना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी लागली. ज्या गावात मी राहत होतो त्या गावात रोझोद्याचे बोरणारे गुरुजी होते. बहिणाबाई यांच्या कवितांची मला असलेली आवड पाहून त्यांनी मला उन्हाळी सुट्यांमध्ये आसोदा गावी नेले.शेतीशी संबध नाही पण कवितासध्या मी प्राध्यापक म्हणून काम करतो. शेतीशी काही संबध नाही. मात्र माझ्याशी संबधित व नात्यातील माणसे शेतीत आहेत. ते त्यांचे दुख: मांडू शकत नाहीत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या व्यथा आणि भावना मी मांडत असल्याचे भालेराव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या निवडक कविता सादर केल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव