शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या पूर्ततेची दिल्लीच्या पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:05 IST

‘सरप्राईज व्हिजिट’

ठळक मुद्देअहवाल दिल्ली येथे परिषदेकडे सादर करणारपाहणीबाबत पाळली जातेय गुप्तता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या पाश्र्वभूमीवर पाहणी करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) पथकाने जिल्हा रुग्णालयात करण्यात येत असलेल्या पूर्ततेची  मंगळवारी पाहणी केली. ‘सरप्राईज व्हिजिट’ असलेल्या या पाहणीदरम्यान पथकाने काय निष्कर्ष काढले याबाबत मात्र पथकाने बोलण्यास नकार दिला.  आपला अहवाल दिल्ली येथे परिषदेकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जळगावात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथे विविध कामांना वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पुरेसा सुविधा असणे गरजेचे असून त्या असल्या तरच मान्यता मिळते. त्यानुसार पाहणी करण्यासाठी हे  पथक सोमवारी जळगावात दाखल झाले. समितीचे अध्यक्ष डॉ.एच.सी. विश्वनाथ, डॉ.पंकज गुप्ता व डॉ.चतुर्वेदी यांचा समावेश असलेल्या  या पथकाने सोमवारप्रमाणे मंगळवारीदेखील पाहणी केली. यामध्ये डॉक्टरांसह विविध पदे भरलेली आहे की नाही, प्रात्यक्षिक कक्ष, पुरेसी जागा, प्रत्येक विषयासाठी वर्गखोल्या आहेत की नाही याची पाहणी पथकाने केली. यामध्ये गेल्या आठवडय़ातच 19 पदे भरले गेल्याने ही बाब पाहणी दरम्यान  सकारात्मक ठरल्याचे समजते. 

काय आहे ‘सरप्राईज व्हिजिट’?वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेने काही नियमावली ठरून दिली आहे. त्यानुसार सर्व पूर्तता असली तरच मान्यता मिळते. यामध्ये महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी करण्यात येत असलेल्या पूर्ततेची पाहणी करण्यासाठी पथक येते. विशेष म्हणजे हे पथक पूर्वसूचना न देता येते. त्यामुळे त्यास ‘सरप्राईज व्हिजिट’ संबोधतात. या मध्ये पहिल्या भेटीत ज्या त्रुटी आढळल्या त्या दुस:या भेटी दरम्यान पूर्ण करायच्या असतात. असेच साधारण तीन ते चार ‘सरप्राईज व्हिजिट’ होतात. या दरम्यान सांगितलेले बदल पूर्ण झाले नाही तर मान्यता मिळत नाही, असे नियमच परिषदेने ठरवून दिले आहे. 

बोलण्यास नकारमंगळवारी पथकातील सदस्यांशी चर्चा केली असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. या बाबत गुप्तता असते, असे सांगून त्यांनी बोलणे टाळले. पथक आपला अहवाल दिल्ली येथे परिषदेला सादर करणार आहे.