या शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील यांनी केले. समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी या शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुील पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील, तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, शहर प्रमुख योगेश गंजे, सभापती डाॅ. अर्चना पाटील, नूतन उपसभापती रावण भिल्ल, सदस्य रामकृष्ण पाटील, युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, अल्पसंख्याक सेलचे इम्रानअली सय्यद, शिवसेना उपतालुकाप्रमुख रतन परदेशी, डाॅ. विशाल पाटील, संजय पाटील, विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, शहर प्रमुख नीलेश पाटील, शेतकरी संघाचे संचालक नागेश वाघ उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांच्या आमदार विकास निधीतून पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साहित्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहरासह तालुक्यातील २५० नागरिकांसह महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी झालेल्या अपंग व दिव्यांग व्यक्तींना सायकलींसह इतर वस्तू आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात येणार आहेत.
या शिबिरात जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी, जिल्हा रुग्णालयाचे डाॅ. अर्मात वाघदे, जयपूर फूट तज्ज्ञ मुंबई शेरसिंग राठोड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अधिकारी एस. पी. गणेशकर, सायक्लोलाॅजिस्ट सुवर्णा चव्हाण आदींनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.