या योजनांमधील गैरव्यवहाराबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरु झाली आहे. या पथकाने दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली. बोदवड पंचायत समितीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांच्या कार्यकाळात तालुक्यात रमाई घरकुल योजनेत ५०० घरे मंजूर झाली होती. परंतु या योजनेत फक्त ३०० घरकुलाची गरज असल्याचे दाखवत २०० प्रकरणांत लाभार्थी असून सुद्धा परत पाठवली. यानंतर पुन्हा पाचशे घरकुलांची मागणीचा प्रस्तावही पाठविला.
त्याचप्रमाणे तालुक्यात चौदाव्या वित्त आयोचा निधी शिल्लक असताना कोल्हाडी व बोरगाव येथील ग्रामनिधी शिल्लक नसल्याचे दाखविल्याचा आरोप आहे.
या पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी. एम. मोहन, धुळे जि.प.चे डेप्युटी सीईओ प्रकाश खोतकर , जळगाव जि.प.चे डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे, यांच्यासह चार अधीकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाने आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, यासंबंधीचा अहवाल आयुक्तांना देण्यात येईल, अशी माहिती चौकशी अधिकारी प्रकाश खोतकर यांनी दिली.