शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोने व्यवहाराचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 10:51 IST

डॉक्टरांना आयकर भवनात बोलावणे

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशीही तपासणी

जळगाव : आयकर विभागाच्या अधिकाºयांकडून बुधवारी सुरु झालेली डॉक्टरांचे हॉस्पिटल व घरांची तपासणी सलग तिसºया दिवशीही सुरू होती. संशयास्पद व्यवहारांचे कागदपत्र ताब्यात घेऊन सोने खरेदी व्यवहारांचीही चौकशी या पथकांनी केली.पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील १०८ आयकर अधिकाºयांच्या पथकाकडून बुधवारी शहरातील आठ बड्या डॉक्टरांचे हॉस्पिटल, पॅथॉलॉजी व त्यांच्या घरी एकाचवेळी धाडसत्र सुरू केले. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली ही तपासणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.डाबी हॉस्पिटलमध्ये कसून चौकशीप्रताप नगरमधील डॉ. राजेश डाबी यांच्या हॉस्पिटलमध्ये खाली हॉस्पिटल व वरती डॉक्टरांचे निवासस्थान आहे. तर हॉस्पिटलला लागून मेडिकल आहे. वरच्या मजल्यावर म्हणजे घरात ६ अधिकारी सलग तिसºया दिवशी तपासणी करत होते तर खाली हॉस्पिटलमध्ये ८ अधिकारी डॉक्टरांकडून माहिती घेत होते. हीच परिस्थिती चिन्मय हॉस्पिटल, नेत्रम, वर्धमान, मधूर हॉस्पिटलमध्येही दिसून आली. काही ठिकाणी सायंकाळी चौकशी आटोपल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना जळगाव येथील आयकर भवनात पाचारण करून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.काय होतेय तपासणी... या तपासणीत बहुतांश डॉक्टरांचे बॅँक खाते, त्यांचे बँकेत असलेले लॉकर, खरेदी विक्रीचे व्यवहार आदी बाबींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टरांशी या डॉक्टरांचा काही संपर्क आहे काय? त्याचे कट प्रक्टीसचे काही व्यवहार होत आहेत काय? पॅथॉलॉजी, मेडिकल स्टोअरशी असलेले व्यवहार आदी बाबींचीही या कारवाईत अतिशय बारकाईने पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. यात काही ठिकाणी संशयास्पद व्यवहार आढळून आल्याने तपासणी सुरूच होती.कागदपत्रे सिलविविध हॉस्पिटलमधील तपासणीत कागदपत्रे पडताळणीत संशयास्पद व्यवहार असल्याचे आढळून आल्याने ही कागदपत्रे सिल करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी सोने खरेदीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार असल्याचे दिसून आल्याने त्या संदर्भातील कागदपत्रेही सिल करण्यात आल्याचे समजते. सलग तिसºया दिवशी ही तपासणी सुरू असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.