शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी साकेगाव ग्रा.पं.ची अभिनव सुवर्ण बक्षीस योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:14 IST

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते कर भरणाऱ्यांना वस्तू वाटप करण्यात आल्या.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी  लाखाची करवसुलीकर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक डस्टबिन मोफत

भुसावळ : कोरोना महामारी लक्षात घेता साकेगाव येथील ग्रामस्थांनी चालू वर्षाचा संपूर्ण कर भरल्यास तथा थकीत बाकी भरल्यास विविध सवलती व सुवर्ण बक्षीस योजना हा ग्रामपंचायत प्रशासनाने अभिनव उपक्रम  हाती घेतला आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी ग्रा.पं. प्रशासनाच्या उपक्रमास साथ देत ग्रामस्थांनी लाखावर कराचा  भरणा केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते कर भरणा करणाऱ्यांना पाण्याचा जार व  डस्टबिन वाटप करण्यात आलेस्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासन सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. चालू वर्ष २०२१/२२ चा संपूर्ण कर भरल्यास पाच टक्के सूट व वर्षभर दररोज २० लीटर मोफत आरो पाणी देण्यात येणार आहे. तसेच १२ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ योजना आयोजित केली आहे.प्रथम बक्षीस १० ग्रॅम सोन्याची चैन, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम सोन्याची  नथ, तृतीय बक्षीस पाच पैठणी साड्या व ५० जार प्रत्येकी एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून लकी टॅक्सधारकांना वाटप करण्यात येणार आहे. १० हजार थकीत बाकी भरणाऱ्या प्रत्येक करधारकास पाण्याचा एक जार भेट म्हणून देण्यात येईल. ५० हजारावर संपूर्ण थकीत बाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना पाच टक्के सूट देण्यात येईल. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक डस्टबिन मोफत देण्यात येईल.अशा विविध भेटवस्तू व डिस्काउंट योजना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या हितासाठी व गावाच्या विकासासाठी निर्माण केली आहे.दरम्यान, ग्रा.पं. प्रशासनाच्या या अभिनय उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी लाखावर कराचा भरणा केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनावणे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, वासेफ पटेल,  राजेश अग्रवाल, ग्रा.पं. सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत  साहित्य वाटप करण्यात आले. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhusawalभुसावळ