शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार : स्वस्त धान्य दुकानावरही ‘सोशल डिस्टंसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:51 IST

सुरेखा महाले यांचा अभिनव उपक्रम

जळगाव / पाचोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात केल्या जात असून यात जिल्हा प्रशासनाच्यावतीनही जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंसिंग’चा अभिनव उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे स्वत:चे आधार प्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी लावण्यास सांगितले जाते. लाभार्थींनी पाईपच्या दुसºया टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य टाकतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे ‘सोशल डिस्टंसिंग’ होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फूट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही महाले सर्वांना देत आहे. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतूक करण्यात येत आहे.देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच नागरिकांनी या कालावधीत सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्याही सूचना दिलेल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या. त्यानुसार ‘मीच माझा रक्षक’ माणून सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटुंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.या उपक्रमाविषयी महाले यांनी सांगितले की, प्रशासनाच्या आवाहनानुसार ‘मीच माझा रक्षक’ माणून लाभार्थ्यांना अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टँड यासाठी एकूण १६४५ रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांच्याकडे एकूण ४७० लाभार्थी असून हे लाभार्थी सुद्धा माझ्याच कुटुंबाचे घटक आहे. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही महाले यांनी सांगितले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून जिल्हा प्रशासनातर्फेही जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीचाच एक म्हणजे पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा महाले यांनी अनोखा उपक्रम राबविला असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सांगितले.दुकानदारांनी मास्कचा वापर करावाजळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत एप्रिल २०२० चे धान्य वाटप सुरू झाले असून जिल्ह्यातील सर्व १९३४ स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. धान्य वाटप करताना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, लाभार्थ्यांमध्ये किमान ३ फुटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी वाटप करताना मास्कचा वापर करावा, तसेच धान्य वाटप करताना वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत इत्यादी सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव