शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अमळेनरात फेरीवाला धोरण गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:08 IST

अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

ठळक मुद्देकिरकोळ विक्रेत्यांनी रस्ते अडविले प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

अमळनेर : शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेशहरातील मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, लालबाग पाण्याच्या टाकीचा परिसर, सुभाष चौक ते कुंटे रोड , गंगा घाट, बसस्थानक परिसरात हातगाड्या व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबते. महिला, आबालवृद्धांना जाण्यास जागा नसते फेरीवाले रस्त्यातून हलायला तयार नसतात. उलटपक्षी बाजूला होण्यास सांगितले तर दादागिरी करतात हातगाडी हलवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. समितीची बैठक होते की नाही ही देखील शोधाची बाब आहे. फेरीवाला धोरणात हातगाड्यांना क्रमांक देऊन त्यांना विभाग ठरवून द्यायचा आहे. ज्या त्या भागातील हातगाड्या त्यांच्याच भागात पाहिजे इतरत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हातगाड्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीकरण झाले असल्याने बेशिस्त वर्तन हातगाडी चालकांकडून घडत असल्याच्या तक्रारी आहेत.शहराची हद्द वाढल्यामुळे चारही दिशांना भाजीपाला बाजार असला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. वाटेल तिथे रस्त्यावर गाडया उभ्या करून पाहिजे त्यावेळी माल विकायला उभे राहत असल्याने प्रवाशी वाहनांना थांबावे लागते. किरकोळ विक्रेत्यांसाठी न.पा ने लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ओटे बांधून दिले होते . मर्यादा रेषा आखून दिली होती परंतु सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. तथापि न. प. चे अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत.एक विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.

टॅग्स :hawkersफेरीवाले