शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

'राष्ट्रवादी' तील इच्छुकांची माहिती मागविली

By admin | Updated: July 29, 2014 13:47 IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी ताणून धरल्याने काँग्रेसने पर्यायी व्यवस्था म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

 

 
काँग्रेसची स्वबळाची तयारी : जिल्हाध्यक्षांनी तातडीने सादर केली प्रदेशाध्यक्षांकडे माहिती
 
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी ताणून धरल्याने काँग्रेसने पर्यायी व्यवस्था म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सध्या राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघातील इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसने तातडीने मागविली आहे. 
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ काँग्रेसच्या तर ७ मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत. या ७ मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुकांच्या नावांची यादी रविवारी तातडीने प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. त्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव चोपड्यातून पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब बारेला, माजी जि.प.सदस्य मासूम तडवी, नगराध्यक्षा मनीषा चव्हाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजीव बाविस्कर, निर्जलाबाई भिल यांच्या नावांचा समावेश आहे. 
चाळीसगावमधून मार्केट कमिटी सभापती रोहिदास लाला पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अनिल निकम, चाळीसगाव महिला काँग्रेस अध्यक्ष शोभा पवार, ४0गाव जनता बँक अध्यक्ष अशोक खलाणे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी राजपूत, युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल मोरे इच्छुक आहेत. 
अनुसूचित जातीसाठी राखीव भुसावळमधून जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र निकम, चाळीसगावचे माजी आमदार अँड.ईश्‍वर जाधव, मोहन निकम, तसेच युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अँड.अविनाश भालेराव तर मुक्ताईनगरमधून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, भुसावळ पं.स.चे माजी सभापती वीरेंद्रसिंह पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आत्माराम जाधव हे इच्छुक आहेत. 
तर पाचोर्‍यातून प्रांतिकचे सरचिटणीस राहिलेले प्रदीप पवार, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अँड.अविनाश भालेराव, तालुकाध्यक्ष शांताराम सोनजी पाटील, जि.प. सदस्य डॉ.उत्तमराव महाजन आदी इच्छुक आहेत.
एरंडोलमधून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस विजय महाजन, जिल्हा सरचिटणीस डॉ.प्रवीण वाघ, प्राचार्य उल्हास पवार, जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील हे इच्छुक आहेत. त्यांनीही मुलाखती दिल्या आहेत. 
या तीन पैकी किमान जळगाव ग्रामीणची जागा तरी मिळावी, यासाठी हालचाली सुरू आहेत. जळगाव ग्रामीणमधून इंटकचे जिल्हाध्यक्ष डी.जी. पाटील, पूर्वी जळगाव महानगराध्यक्ष राहिलेले उत्तमराव सपकाळे, यांच्यासह दोन-तीन जण इच्छुक आहेत.
 
मंगला पाटीलही इच्छुक
जळगाव शहरची जागा पूर्वीच्या वाटपानुसार काँग्रेसकडे असली तरीही जर ही जागा फेरबदलात राष्ट्रवादीकडे आली तर त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. महानगराध्यक्ष मनोज चौधरी मुंबईत तळ ठोकून आहेत. तर बैठकीसाठी मुंबईला जात असलेल्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील ह्यादेखील जळगाव शहरातून उमेदवारीची मागणी करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी महिला पदाधिकार्‍यांची जिल्हानिहाय बैठक मंगळवारी आयोजित केली असून जिल्ह्यातील महिला पदाधिकारीही या बैठकीसाठी रवाना झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषा दराडे, आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी महिला पदाधिकार्‍यांच्या जिल्हानिहाय बैठकी होतील. तर बुधवारी सर्वसाधारण बैठक होणार आहेत. महिला पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक ग्रामीण भागात ७ ठिकाणी मेळावे प्रदेश काँग्रेसने राष्ट्रवादीशी वाटाघाटी सुरू ठेवल्या असल्या तरीही जर वाटाघाटी फिस्कटल्या तर ऐनवेळी फजिती नको म्हणून स्वबळाची तयारी चालविली आहे. त्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात ७ ठिकाणी मेळावे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे.