शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

indpendece day गांधीजींच्या आंदोलनातून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:27 IST

एकनाथ माळी : ध्वजारोहणाचा आनंद मोठा

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : गावातील हॉटेलवर २५ पैसे रोजंदारीने काम करुन सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १६ वर्षांचा होतो. पारतंत्र्य कसे असते ते जवळून पाहिले, हालअपेष्टा सहन केल्या, असे जामनेर येथील स्वातंत्र्य सेनानी एकनाथ सखाराम माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.माळी यांचा जन्म ८ जानेवारी १९३१ चा. लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाचे वेड. महात्मा गांधींच्या आंदोलनापासून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. १९५५ मध्ये गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्यासोबत राजाराम बावस्कर व जयराम मोरे होते. गांधींच्या हत्येनंतर त्यांना चार महिन्यांचा कारावास धुळे येथे भोगावा लागला.लहान असताना वामन दुधमांडे, हरिभाऊ बारी, पांडुरंग सोनवणे यांचे सोबत जामनेर रेल्वेस्थानकावरील सिग्नल फोडले. रेल्वेस्थानकाची देखभाल करणाऱ्या मुकदमाने पाठलाग केला. पळत जाऊन एका शेतात लपलो. मजुरांसोबत काम केल्याने सापडलो नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. गोवा मुक्ती संग्रामात केलेल्या आंदोलनानंतर खिशात पैसे नसल्याने विनातिकीट पुण्यापर्यंत रेल्वेने आलो. मात्र स्वकियांकडूनच दंड वसूल केला गेला, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. दोन वर्षांपूर्वी माळी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. पहिल्या ध्वजारोहणाचा उत्साहदेखील अतिशय मोठा होता.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJamnerजामनेर