शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत मातेच्या जयजयकारात मिळाली शाळेमध्ये मिठाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:12 IST

स्वातंत्र्य दिन विशेष : ८५ वर्षीय शिवाजी मराठे यांनी दिला आठवणींना उजाळा

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : ‘आम्ही मुले त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत आलो. दुसरीत होतो मी. तो दिवस होता, १५ आॅगस्ट १९४७ चा. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. गुरुजींनी घोषणा दिली. 'भारत माता की जय, वंदे मातरम...! नंतर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आम्हाला मिठाई मिळाली...’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ८५ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी रंगनाथ मराठे यांना स्वातंत्र्याच्या मंतरलेल्या आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.शिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तिसंग्राम आंदोलनातही सहभाग घेतला आहे. ७२ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी १९४७ मध्ये ते इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होत १३ वर्षे. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.भाषणे रेडिओवर ऐकायचोस्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, ‘मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडिलांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य - पारतंत्र्य असे शब्द ऐकायला मिळायचे.महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरून ऐकली जायची. रेडिओवरील भाषण ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची.' १५ आॅगस्ट १९४७ ची आठवण सांगताना त्यांचा ऊर भरून आले. ते म्हणाले, 'तो दिवस अजूनही स्मरणात असून त्यादिवशी भारत स्वतंत्र झाला म्हणून मिळालेल्या मिठाईची चव अजूनही जिभेवर रेंगाळली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ती कायम राहील...'स्वार्थ बळावतो आहेसद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, 'युवा पिढी चंगळवादाच्या मागे धावते आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवशिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तिसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी १५ दिवस ते गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तिदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसChalisgaonचाळीसगाव