शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी डेअरींच्या वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना दरवाढीचा दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:36 IST

गायीसह म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ, लागलीच अंमलबजावणीही केली सुरु

ममुराबाद, ता. जळगाव : गुजरात राज्यातील दूध संघासह स्थानिक खासगी डेअरींच्या वाढत्या स्पर्धेपुढे हतबल झालेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास) शेतकऱ्यांकडून पुरवठा होणाºया दुधाच्या खरेदीदरात नुकतीच वाढ केली. खरेदीदर वाढवल्यानंतर गायीसह म्हशीच्या दूध विक्री दरातही संघाने प्रतिलिटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी ६ मार्चपासून सुरूदेखील झाली आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीला गुजरात राज्यातील दूध संघ तसेच स्थानिक खासगी दूध डेअरींची फार स्पर्धा नसल्याने जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दैनंदिन दूध संकलन सुमारे चार लाख लीटर इतके होते.तुलनेत यंदा मोठी स्पर्धा असल्याने जळगाव दूध संघाचे दैनंदिन संकलन तीन लाख लीटरपर्यंत खाली आले आहे. प्राप्त माहितीनुसार संघाकडे सद्य:स्थितीत गायीचे १ लाख ८० हजार लीटर तसेच म्हशीच्या १ लाख २० हजार लीटर दुधाचा पुरवठा होत आहे.गेल्या वर्षी गायीसह म्हशीच्या दुधाचे खरेदीदर कमी असूनही संघाकडील दैनंदिन संकलन मोठ्या प्रमाणात होते.दूध गुजरातकडेत्यामानाने यंदा खरेदीदरात भरमसाट वाढ होऊनही दुधाचे संकलन वाढत नसल्याने संघाच्या नाकीनऊ आले आहेत. स्पर्धात्मक खरेदीदरामुळे जिल्ह्यातून दररोज सुमारे ५० हजार लीटर दूध गुजरात राज्यात रवाना होऊ लागले आहे.दुसरीकडे स्थानिक खासगी डेअरींकडूनही विकासपेक्षा जास्तीचे खरेदीदर तसेच आगावू रक्कम देऊन दुधाची खरेदी वाढविण्यात आली आहे.अनेक डेअरींचे आव्हानत्याचा मोठा फटका आतापर्यंत सहन करणाºया जळगाव दूध संघासमोर बोदवडच्या अमर डेअरीसह चोपड्याच्या बापू डेअरीसारख्या इतर काही खासगी डेअरींनी आणखी नवे आव्हान उभे केले आहे.खाजगी डेअरीकडे ओढाखासगी डेअरींकडून जिल्हांतर्गत वितरीत होणाºया दुधाचे विक्रीदर आजही कमीच आहेत. त्याचा विपरीत परिणाम विकास दुधाच्या खपावर यापूर्वीच झालेला असून, विक्रीदरात नव्याने वाढ झाल्यानंतर विकासच्या ग्राहकांचा खासगी डेअरींकडून वितरीत दुधाकडे ओढा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत दुधाचे खरेदीदर वाढविण्याची वेळ आल्यानंतर विक्रीदर वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर नव्हता. गाय तसेच म्हशीच्या दुधाचे विक्रीदर प्रतिलिटर साधारण दोन रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. नवीन दराची अंमलबजावणी ही ६ मार्चपासून लागू देखील झाली आहे.- के. बी. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक, जळगाव जिल्हा दूध संघ.खासगी दूध व्यावसायिकांच्या तुलनेत विकासचे दूध तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ यापूर्वीच किमतीने थोडे महाग होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी देखील पसरलेली असतांना दुधाच्या विक्रीदरात प्रतिलिटरमागे आणखी दोन रुपयांची वाढ झाली आहे. स्वस्त पर्याय शोधणारे ग्राहक त्यामुळे विकास व्यतिरिक्त इतर दूध खरेदीला प्राधान्य देण्याची शक्यता वाढली आहे. - दूध बूथ चालक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव