जामनेर, जि.जळगाव : दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या तीनही स्वीकृत नगरसेवकांनी मंगळवारी जळगावला राजीनामे सादर केले.नजिकच्या काळात होणाºया या पदाच्या नियुक्तीसाठी वर्णी लागावी यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे.इम्तियाजखान, डॉ.अरविंद बोंडेकर, पुखराज डांगी या स्वीकृत नगरसेवकांनी ४ रोजी आपले राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. सामाजिक क्षेत्रात काम केलेल्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात.दरम्यान, पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते स्वीकृतपदी आपली वर्णी लागावी यासाठी आमदार गिरीश महाजन यांची मनधरणी करताना दिसत आहे. शरीफ मन्सुरी, रफिक शेख, वसीम सय्यद, श्रीराम महाजन, प्रल्हाद सोनवणे, दीपक तायडे, न्याज महम्मद लकडीवाले, रवींद्र झाल्टे, हेमंत वाणी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
स्वीकृत नगरसेवकांच्या राजिनाम्याने नियुक्तीसाठी वाढली स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:37 IST
जामनेर , जि.जळगाव : दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या तीनही स्वीकृत नगरसेवकांनी मंगळवारी जळगावला राजीनामे सादर केले. नजिकच्या काळात ...
स्वीकृत नगरसेवकांच्या राजिनाम्याने नियुक्तीसाठी वाढली स्पर्धा
ठळक मुद्देजामनेर येथे इच्छुकांमध्ये चढाओढअनेकांनी लावली फिल्डिंग