शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टाळण्यासाठी दुकानांची वेळ वाढवा - जिल्हाधिका-यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:15 IST

घरपोहच सेवा देण्यावर प्राधान्य द्या

जळगाव : किराणा माल, धान्य खरेदी व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व किराणा व्यापाºयांनी आपली प्रतिषठाने सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरातील व्यापाºयांना दिल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लॉक आऊट असल्याने जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागल्याने ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात या विषयी चर्चा करण्यासाटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एकता रिटेल किराणा असोसिएशन व दाणाबाजार व्यापारी असोसिएशन यांच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. या वेळी  एकता रिटेल किराणा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार ललित बरडिया, अनिल कांकरिया, नितीन रेदासनी, धर्मेंद्र बोºहा, दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया उपस्थित होते.घरपोहचला प्राधान्य द्याबाहेर पडणाºयांची गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी शक्य असल्यास जास्तीत जास्त घरपोहच सामान देण्याचा प्रयत्न करा  असे सांगत कुठल्याही व्यवसायिकाने परिस्थितीचा लाभ घेत काळाबाजार करण्याचा प्रयत्न अजिबात करु नये अन्यथा अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या वेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला.ओळखपत्र द्याज्या व्यवसायिकांना शक्य असेल त्यांनी आपापल्या प्रतिष्ठानातील आपल्या सहकाºयांना प्रतिष्ठानाचे ओळखपत्र, त्यांचे व्ययक्तिक आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड व प्रतिष्ठानाच्या शॉप अ‍ॅक्ट लायसेन्सची झेरॉक्स सोबत ठेवण्याबाबत सांगावे, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.  असोसिएशनच्यावतीने आपल्या प्रतिष्ठानचे नाव टाकून ओळखपत्र दिल्यास दुकानांवरील काम करणाºया व्यक्तींना पोलीस तपासणीचा त्रास होणार नाही, असेही जिल्हाधिकाºयांनी सूचित केले.‘कोरोना’पुढे करोडोंचा उपयोग नाहीसंचारबंदी व लॉक आऊटमुळे कोणीही घाबरण्याची गजर नाही, मात्र तरीदेखील नागरिक खरेदी करीत आहे. गर्दी टाळणे महत्त्वाचे आहेच.  सोबतच अशा परिस्थितीत नागरिकांना तुमची आवश्यकता असण्याची हीच वेळ असल्याने व्यापाºयांनी प्रतिष्ठान बंद ठेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी करोडो रुपये कमविले तरी कोरोनाचा रुग्ण पाहिल्यास त्यापुढे करोडो रुपये काहीही कामाचे राहणार नाही, त्यामुळे कोणीही गैरफायदा घेऊ नये, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी या वेळी केले.आरोग्याच्या दृष्टीने प्रतिष्ठानमधील प्रत्येक सहकाºयाला प्रत्येकी दोन मास्क, देऊन साबण अथवा हॅण्ड वॉशने हात धुण्यास सांगावे किंवा सॅनिटाईज करण्यास सांगावे, प्रतिष्ठानमध्ये ग्राहकांना एकमेकांपासून कमीत-कमी एक मीटर अंतर ठेवावे, दुकानातील सहकाºयाला शारिरीक त्रास जाणवत असल्यास त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे, होलसेल सप्लायरकडून आपणास वेळोवेळी पुरवठा व्यवस्थित होईल असे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधि-यांनी या वेळी दिल्या. तसेच  आपापल्या प्रतिषठानामध्ये  गर्दीचे नियोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या-त्या प्रतिष्ठानचीच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव