गेल्या अनेक महिन्यांपासून दूध व्यवसाय न परवडेसा झाला आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पशू खाद्याच्या दरामुळे दूध उत्पादकांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. मात्र या भाववाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
जिल्हा दूध संघाच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक दरवाढ आहेत. म्हैस दूध खरेदी दरात प्रथमच प्रतिफॅट ५० पैशांनी वाढ करून सात रुपये प्रतिफॅट करण्यात आली आहे. त्यासोबतच गाय दूध खरेदी दरातदेखील सर्वाधिक वाढ झाली आहे.
नवीन दर पुढीलप्रमाणे
१ सप्टेंबरपासून दरवाढ करण्यात आल्याने म्हैस दूध खरेदी दरात ९ एसएनफने ६ फॅट साठी, ४२ रुपये तर सर्वाधिक १२ फॅटसाठी ८१.५० रुपयांपर्यंत भाव मिळेल आणि गाय दूध खरेदी दर २७ रुपये प्रतिलिटरप्रमाणे ८.५ एसएनफने ३.५ फॅटसाठी २७ तर ५.५ फॅटपर्यंत ३२.७० दर मिळणार आहे.