शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळांमधील मराठी टक्का वाढावा

By ram.jadhav | Updated: December 12, 2017 23:49 IST

खान्देशातील मुलांनी पुढे यावे : अथर्व भोकरे देशात ६० वा

ठळक मुद्देएनडीएमध्ये करिअर करण्याच्या नानाविध संधी उपलब्धजळगाव जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांची निवडसैनिकी शाळांना प्राधान्य द्यावे

राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ १३ -जळगाव : बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये करिअर करण्याच्या नानाविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत़ मात्र त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ पालकांनीही याबाबत माहिती जाणून घेऊन आपल्या पाल्यांना शिस्तबद्ध व विविध कलागुणांचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळेल यासाठी सैनिकी शाळांना प्राधान्य द्यावे़ येथे मिळणाºया दर्जेदार व गुणात्मक शिक्षणासाठी आपल्या मुलांना या शाळांमध्ये पाठविण्याची तयारी करावी, असे मत नुकतीच एनडीए-एनएची परीक्षा पास झालेल्या अथर्व अनिल भोकरे याने व्यक्त केले आहे़राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येते़ कठीण चाचणी पातळी पार करून या परीक्षेत अथर्वने १८०० पैकी ८४२ गुण मिळवत देशात ६० वा क्रमांक मिळविला़ तसेच सिंहगड येथील एका खासगी महाविद्यालयात आयटी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षालाही अथर्वने प्रवेश घेतलेला आहे़ यावर्षी जळगाव जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांची निवड या परिक्षेत झाली आहे़कशी मिळवावी माहिती़़़महाराष्ट्रात सैनिकी प्रशिक्षण शाळा सातारा सैनिकी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे़ या शाळेत सहावी आणि नववीमध्ये चाचणी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळविता येतो़ याबाबत माहितीसाठी इंटनेटवर अनेक चांगल्या प्रकारची संकेतस्थळे आहेत़अथर्वचे प्राथमिक शिक्षण चाळीसगावसारख्या ग्रामीण भागात झाले़ त्यानंतर जळगाव येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच सैनिकी शाळेच्या चाचणीची तयारी केली व इयत्ता नववीमध्ये अथर्वने सातारा सैनिकी शाळेत प्रवेश मिळविला़ विशेष म्हणजे त्याचे वडील अनिल भोकरे व काका व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांचेही शिक्षण याच सैनिकी शाळेत झालेले आहे़ काकांप्रमाणेच त्याचेही नौदलात जाण्याचे स्वप्नकाय असते एनडीए-एनए परीक्षा़़बारावी सुरू असतानाच वयाच्या १७ व्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ही परीक्षा ४ वेळा देता येते़ ही परीक्षा वर्षातून २ वेळा होते़ गणित ३०० व सामान्यज्ञान ६०० अशी ही ९०० गुणांची प्राथमिक परीक्षा असते़ यामध्ये पात्र झाल्यावर एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मध्ये ५ दिवस ९०० गुणांची फेरी अशी एकूण १८०० गुणांची संपूर्ण चाचणी परीक्षा होते़ यातून मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते़ अशी संपूर्ण एनडीए-एनए ची चाचणी परीक्षा असते़