शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:41 IST

वनविभाग करतेय लपवाछपवी

ठळक मुद्देयावलला गुन्हा दाखलशिरपूरला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जळगाव : जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या वनक्षेत्रात बिबट्यांचे मृत्यूचे प्रकार वाढले असून महिनाभरात चार घटना घडल्या असून त्यातील यावल व शिरपूर या दोन घटनांमध्ये बिबट्याची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. मात्र यावलच्या घटनेतच गुन्हा दाखल झाला असून शिरपूरच्या घटनेत तर गुन्हा दाखल करण्याची देखील तसदी वनविभागाने घेतलेली नाही.जामनेर तालुक्यातील लाढशिंगी शिवारात एका नाल्याच्या कडेला बुधवारी सायंकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूबाबत वनविभागाने अत्यंत गुप्तता पाळत गुरूवारी त्या बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. हा बिबट्या वयोवृद्ध असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र यानिमित्ताने जिल्ह्यात किंबहुना खान्देशात बिबट्याची शिकार करण्याचे प्रकार वाढ झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात बिबट्याच्या मृत्यूच्या ४ घटना घडल्या. त्यातील दोन घटनांमध्ये बिबट्याची शिकार झाली आहे.यावल वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत बिबट्याने हल्ला केल्याने त्यास प्रतिकार करीत तडवी नामक युवकाने बिबट्यालाच दगडाने ठेचून ठार केल्याचा दावा केला होता. मात्र या युवकाने जबाब वारंवार बदलला. रस्त्याने जात असताना बिबट्याने हल्ला करीत हात धरल्याचे सांगितले. मात्र त्या युवकाच्या जखमांवरून त्यात तथ्य वाटत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच बिबट्याला दगडाने ठेचून मारल्याचा दावा युवकाने केला. मात्र बिबट्याच्या अंगावरील खुणा या कुºहाड अथवा त्यासारख्या तीक्ष्ण हत्याराच्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या प्रकरणी अखेर त्या युवकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी यावल वनविभागाचे आरएफओ व्ही.एम. पाटील हे करीत आहेत. तर शिरपूर येथे दोन लोकांवर हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी बिबट्याला बंदुकीने गोळी मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी वनविभागाने गुन्हा देखील दाखल केला नाही.बिबट्याचे शवविच्छेदन करुन अहवाल रवानामृत बिबट्याला अग्नीडाग देण्यात आला यावेळी सहाय्यक वनरक्षक एन. ए.पाटील, चाळीसगावचे वनक्षेत्रपाल संजय मोरे, जामनेरचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील, धनंजय पवार, बळवंत पाटील, सुनील पवार, आर.एस.ठाकरे, विकास गायकवाड तसेच सरपंच जीवन उगले, पोलीस पाटील मिलिंद लोखंडे उपस्थित होते. जामनेरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यवहारे, वाकोदचे डॉ.चंद्र्रकांत आव्हाळ, फत्तेपूरचे डॉ.राहुल ठाकूर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन करून अहवाल तपासासाठी पाठविला.तोंडापूर जवळील लाढशिंगी शिवारात नाल्याच्या कडेला बिबट्या मरून पडला होता. शेतकऱ्यांच्या ते निदर्शनास आल्याने वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी तेथे पाहणी केली. मी देखील स्वत: आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. मात्र हा बिबट्या वृद्ध झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.-डी.डब्ल्यू. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग.सायंकाळी घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे घटनेचा माझ्यासमक्ष पंचनामा करण्यात आला.-जीवन उगले, सरपंच, ढालसिंगीशेतात काम करणाºया मजुरांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. मी खात्री करून ही माहिती वनविभागाच्या अधिकाºयांंना कळविली.-सचिन वसंत पाटील, शेतकरी, तोंडापूर

टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव