शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाला मारहाण करीत 4 लाख लांबविले, जळगाव ‘एमआयडीसी’तील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:01 IST

संशयित ‘हाडय़ा’ला अटक

ठळक मुद्देसहा तासात अटकआरडाओरड केला मात्र शुकशुकाट..

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- शहरातील सुप्रिम कॉलनीतील घरुन कामगारांचे पगार अदा करण्यासाठी कंपनीत जात असताना उद्योजक मंगलसिंग दिवानसिंग पाटील (वय 52, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांना भर रस्त्यात अडवून दुचाकीवरुन आलेल्या एका चोरटय़ाने मारहाण केली आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले चार लाख रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजता एमआयडीसीतील बनवट इंडस्ट्री समोर घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगलसिंग पाटील यांनी तुषार पाटील यांच्या मालकीची डब्लु.सेक्टरमध्ये असलेली चटई कंपनी भाडय़ाने चालवायला घेतली आहे. मुलगा पंकज व निलेश असे मिळून तिघे जण या कंपनीचे कामकाज पाहतात. या कंपनीत 30 मजूर कामाला असून दोन सत्रात कामकाज चालते. या कामगारांचे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान पगार अदा केले जातात. या पगारासाठीच मंगलसिंग पाटील हे घरातील चार लाख रुपये घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.ङोड.7700) रात्री  कंपनीत जायला निघाले होते.वळणावर दुचाकी आडवी लावून बुक्क्याने मारहाणमंगलसिंग पाटील हे रेमंड चौकातून पुढे जात असताना बनवट इंडस्ट्री जवळ वळण घेत असताना मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या जाड शरीरयष्टीच्या एका चोरटय़ाने पाटील यांच्या दुचाकीच्या समोर दुचाकी आडवी लावली व पाटील यांना खाली ओढून तोंडावर बुक्क्याने मारहाण केली. त्यात ते जमिनीवर कोसळले. त्याच वेळी चोरटय़ाने पटकन डिक्की ओढून चार लाख रुपये रोख व आधारकार्ड असलेली बॅग काढून पळ काढला. सहा तासात अटक गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, सचिन मुंडे, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व गोविंदा पाटील यांचे एक पथक तयार केले. त्यानुसार या पथकाने राबविलेल्या मोहीमेत विकास राजू गुमाने उर्फ हाडय़ा (रा.कंजरवाडा, जळगाव) याला रात्री दहा वाजता याला शोधून काढून अटक केली. मोडस ऑपरेंडीवरुन हाडय़ा पोलिसांच्या हाती लागला.आरडाओरड केला मात्र शुकशुकाट..रात्रीची वेळ असल्याने यावेळी रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे पाटील यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यांनी आरडाओरडही केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. थोडय़ावेळाने शंकर मिस्तरी नावाचा एक व्यक्ती रस्त्याने येताना दिसला असता त्याला पाटील यांनी हकीकत सांगितली. मिस्तरी यांनी पाटील यांच्या दोन्ही मुलांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही मुले व कंपनीतील रामसिंग पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाटील यांना दवाखान्यात दाखल केले. बुधवारी दुपारी त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.