शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत शॉपिंग उत्सव’चे थाटात उदघाटन

By admin | Updated: January 7, 2017 00:46 IST

ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : ‘लोकमत’चे उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचा मान्यवरांचा सूर

जळगाव : पारख प्लेक्सस रिअल्टी लि. प्रस्तुत तीन दिवसीय लोकमत शॉपिंग उत्सव-2017चे मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी थाटात उद्घाटन झाले.  ‘लोकमत’चे सर्वच उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी काढले. लोकमत शॉपिंग उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद               लाभला. रिंगरोडवरील यशोदया मल्टीपर्पज हॉलमध्ये 6 ते 8 जानेवारी दरम्यान  आयोजित या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे, पारख प्लेक्सस रिअल्टी लि. ‘मेरा घर’चे विनय पारख, ए.एम.सोलर ट्रंकीचे योगेश मुंदडा, साईकृपा बेन्टेक्स ज्वेलर्स अॅण्ड कॉस्मेटिक्स प्रेङोंट आर्टीकलच्या हेमलता बामणोदकर, रुख्मा टेण्ट हाऊसचे किशोर महाजन, ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख मिलिंद कुळकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा उपस्थित होते. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतीस अभिवादन करून मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वालन व फीत कापून उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मिलिंद कुळकर्णी यांनी केले. सुरुवात चांगली झाली तर वर्ष चांगले विनय पारख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात ‘लोकमत’ ने या उत्सवाचे आयोजन केल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण वर्षही चांगले जाते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ व जळगाव नाण्याचा दोन बाजूविनय पारख म्हणाले, ‘लोकमत’ व जळगाव शहर म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. दिवसाची सुरुवात ‘लोकमत’शिवाय शक्यच नाही. ‘लोकमत’च्या विविध योजना, विविध        सदरे यामुळे तो एक अविभाज्य घटक बनला आहे. पारख प्लेक्सस रिअल्टी लि. ‘मेरा घर’ प्रस्तुत लोकमत शॉपिंग उत्सव 2017 साठी ए.एम.सोलर ट्रंकी यांचे सहप्रायोजकत्व तर गिफ्ट पार्टनर म्हणून साईकृपा बेन्टेक्स ज्वेलर्स अॅण्ड कॉस्मेटिक्स प्रेङोंट आर्टीकल हे लाभले आहे.या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अबालवृद्धांची गर्दी झाली होती.‘लोकमत’च्या प्रेरणेने मनपाही खरेदी उत्सव सुरू करणार‘लोकमत’ अनेक बाबतीत अग्रेसर असल्याचे, आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले. लोकांना काय हवे हे ‘लोकमत’ जाणून घेते. ‘लोकमत’चा आदर्श घेऊन विविध उपक्रम इतरही राबवित आहे. त्यामुळे ‘लोकमत’ प्रेरणादायी आहे. या उत्सवाचे सोनवणे यांनी विशेष कौतुक केले व या उत्सवापासून प्रेरणा घेऊन येथील बंद पडलेला मनपाचा खरेदी उत्सव या वर्षी सुरू करू व येथील रचना तेथे करण्यात येईल, असा मनोदयही व्यक्त केला. स्टॉलची घेतली माहितीउद्घाटन समारंभानंतर मान्यवरांनी उत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यामध्ये काही खाद्य पदार्थाची चव घेतली.व्यवसायाची चांगली संधीनोटा बंदीनंतर दोन महिने कठीण गेले, मात्र नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने झाल्याने सर्वाना व्यवसायाच्या चांगली संधी आहे. या उत्सवात मुंबईतील स्टॉल धारक सहभागी झाले असून यापुढे लंडनचेही स्टॉलधारक सहभागी होतील, असा विश्वास योगेश मुंदडा यांनी मनोगतात व्यक्त केला. गृहिणींची इच्छा होणार पूर्ण‘लोकमत’चे उपक्रम उत्कृष्ट असतात. त्यातील या शॉपिंग उत्सवामुळे गृहिणींच्या खरेदीची इच्छा पूर्ण होईल, असा विश्वास हेमलता बामणोदकर यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबी होण्याचीही संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. घर खरेदी ते घरातील सर्व वस्तू एकाच ठिकाणीया शॉपिंग उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे  घर, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साडी, पेस्ट कंट्रोलसह पापड, कुरडया, कुर्तीज्, मुखवास, हँडमेड गिफ्ट, बेन्टेक्स ज्वेलरी याशिवाय फुडझोन मध्ये गरमागरम मुंगभजी, भरीत-भाकरी, पाणीपुरी, अप्पे अशा विविध वस्तूंचा आस्वाद घेण्यासह महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या वस्तूंचीही रेलचेल येथे असल्याने घर खरेदीपासून ते घरातील सर्व वस्तू एकाच दालनाखाली खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या ज्वेलरी आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध होत नाही अशा मुंबईच्या ज्वेलरीदेखील या उत्सवात खरेदी करता येणार आहे. गेमझोनखरेदीसोबतच खाद्य पदार्थाचा आस्वाद घेताना बच्चे कंपनीला खेळण्यासाठी गेमझोनचीदेखील सोय करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी सोडतीद्वारे विशेष      लकी-ड्रॉ काढण्यात येत असून विविध भेट वस्तू जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे.