शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

लाभार्थी वाढीचा फंडा, २५० कामगारांच्या अटीला ‘फाटा’, खर्च कोट्यवधींच्या घरात

By विलास बारी | Updated: October 8, 2023 22:31 IST

माध्यान्ह भोजन की ठेकेदाराचे पोषण?; घरकामगार, गृहिणी, शेतकरी यांच्या नावांना मंजुरी

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : राज्य शासनाने या योजनेंतर्गत माध्यान्ह व रात्रकालिन भोजन वाटप करताना २५०पेक्षा कमी बांधकाम कामगार काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने सर्वेक्षण करून व पुरवठादार संस्थेने सादर केलेल्या ठिकाणी माध्यान्ह भोजन पुरवठा करण्याबाबत आदेश काढले. मात्र, ग्रामपंचायत आणि ठेकेदाराकडून आलेल्या याद्यांना सरसकट मंजुरी देण्यात आल्यामुळे शासनाच्या अटीचे उल्लंघन झाले. लाभार्थी वाढीचा फंडा हिट ठरला आणि योजनेवरील हा खर्च कोट्यवधीच्या घरात गेला.

काय आहे माध्यान्ह भोजन योजनेचे स्वरूप

शासनाने नाशिक विभागासाठी नियुक्त केलेल्या मे. इंडो अलाईड प्रोटीन फूड्स प्रा. लि. या कंपनीला एका लाभार्थीला भोजन पुरवण्यासाठी ६२ रुपये ७३ पैसे अदा करण्यात येतात. हे भोजन कामगार नाक्याच्या ठिकाणी सकाळी ८:०० ते १०:०० व बांधकामाच्या ठिकाणी दुपारी १२:०० ते २:०० यावेळेत वितरित करण्यात येते.

योजना बांधकाम कामगारांसाठी लाभार्थी मात्र दुसरेच

फक्त बांधकाम कामगारांसाठी असलेल्या या योजनेत याद्यांची शहानिशा न झाल्याने घरकामगार, मजूर व उसतोड कामगार, गृहिणी व शेतकऱ्यांनाही या याद्यांमध्ये लाभार्थी दाखविण्यात आले आहे. ग्रामपंचायतींकडून आलेल्या याद्यांमध्ये एकाच कुटुंबातील तीन ते चार जणांची नावे टाकण्यात आली आहेत.

२५० बांधकाम कामगारांच्या अटींच्या नियमाला हरताळ

राज्य शासनाने केलेल्या करारात ज्या बांधकाम साईटवर २५०पेक्षा कमी कामगार आहेत. त्याच बांधकाम साइटवर भोजन पुरविण्यात यावे, अशी अट घातली आहे. मात्र, साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने साकेगाव, वसंतवाडी, शेळगाव या ग्रामपंचायतीने सादर केलेल्या ८०० ते १००० कामगारांच्या यादीला सरसकट मंजुरी देत भोजन पुरविल्याचे दाखविण्यात आले आहे.

सलग महिनाभर भोजन वाटप

सर्वसाधारणपणे कोणत्याही बांधकाम साइटवरील कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुटी असते. मात्र, महाराष्ट्र स्टेट पाॅवर जनरेशन कंपनी असो की, ग्रामपंचायतीच्या अंतर्गतच्या बांधकाम साइट. याठिकाणी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सलग भोजन वाटप केल्याचे दाखविण्यात आले आहे. या प्रकाराकडे साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे.

स्पाॅट व्हिजिटचे रेकाॅर्ड उपलब्ध नाही

माध्यान्ह व रात्रकालिन भोजन योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना तिची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे किंवा नाही, यासाठी या कार्यालयाकडून वेळोवेळी स्पाॅट व्हिजिट करणे अपेक्षित होते. मात्र, अपूर्ण मनुष्यबळाच्या नावाखाली नऊ महिन्यात केवळ सात ते आठ वेळा स्पाॅट व्हिजिट केल्याचे ‘लोकमत प्रतिनिधीने’ केलेल्या चाैकशीत सांगण्यात आले. विशेष म्हणजे कुणाची तक्रार आली, काय कारवाई केली, या सर्व बाबींचे कोणतेही रेकाॅर्ड कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

या ठिकाणी झाले नियमाचे उल्लंघन

बांधकाम ठेकेदाराचे नाव             कामगार             साइट

  1. वरद एंटरप्रायजेस - ९९२ कामगार            कोळंबा आश्रम शाळेजवळ, चोपडा
  2. दुर्गा मराठे             ६०२ कामगार            ग्रा. पं. बिलवाडी, ता. जि. जळगाव
  3. श्री कन्स्ट्रक्शन            ५०२ कामगार            शेळगाव, मराठी शाळा, ता. जि. जळगाव
  4. स्टेट पाॅवर जनरेशन कंपनी १,०७६ कामगार दीपनगर, भुसावळ
  5. पाॅवर मेक             ५७१ कामगार            दीपनगर, भुसावळ

तक्रार आल्यानंतर स्पाॅट व्हिजिट करून कार्यालयाकडून तक्रारीचे निवारण केले जात होते. कार्यालयात एकूण २६ पदे आहेत. त्यापैकी १६ पदे रिक्त आहेत. केवळ २ शाॅप इन्स्पेक्टर आहेत. अपूर्ण मनुष्यबळामुळे सर्वच ठिकाणी स्पाॅट व्हिजिट करता आली नाही.-चंद्रकांत बिरार, साहाय्यक, कामगार आयुक्त, जळगाव

टॅग्स :State Governmentराज्य सरकार