शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

'तो' प्रवास अखेरचा ठरला! घसरलेली दुचाकी दगडावर आपटून तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 00:11 IST

डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्यानं तरुणाचा दुर्दैवी अंत

जळगाव : धावती दुचाकी घसरुन ती दगडावर आदळल्याने गुलाब नवल बाविस्कर (३८,या. इंदिरानगर कुसुंबा, ता. जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब बाविस्कर हे एमआयडीसीतून महामार्गाकडे दुचाकीने जात असताना गोदावरी अभियांत्रिकी जवळ दुचाकी घसरली. त्यात काही अंतरावर दगडावर जाऊन दुचाकी आदळली. त्यामुळे गुलाब यांच्या डोक्याला, छातीला मार लागला. नाकातोंडातून रक्त आले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व गणेश शिरसाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुलाब यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. खिशातील आधारकार्ड व मोबाईलवरून मृतांची ओळख पटली. पोलिसांनी मृताच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गुलाब पाईपच्या कंपनीत कामाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील व दोन मुले असा परिवार आहे.