शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णनगरीत अवतरले सोनेरी-चंदेरी राम-लखन, सीतामाता

By विजय.सैतवाल | Updated: January 21, 2024 22:03 IST

आकर्षक मंदिर प्रतिकृतीही ठरतेय लक्षवेधी : भेट देण्यासाठी सोने-चांदीचे शिक्के

जळगाव : अवघ्या काही तासांवर आलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अख्खे शहर भगमेमय तर झालेच असून सुवर्णनगरी जळगावात सोनेरी-चंदेरी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान अवतरले आहेत.

घरात नित्य पूजनासह मित्र, नातेवाईकांना भेट देण्यासाठी श्रीराम मंदिर प्रतिकृती, लहान, मोठ्या आकारातील सोने-चांदीच्या मूर्ती, शिक्के, सुवर्ण मुलामा असलेल्या पादुका शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन दिवसांपासून या सर्वच वस्तूंना मोठी मागणी वाढली असून सोमवार, २२ जानेवारीच्या मुहूर्तावर ही खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा शिगेला पोहचली असून यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शहरं, गावं सजू लागली आहेत. यात जळगाव शहरही पताका, मोठमोठे कटआऊट, भव्य ध्वज यांनी सजले असताना सुवर्ण पेढ्यांमध्येही या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.

आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींना मोठी पसंती वाढत असल्याने जळगावात सुवर्ण मुलामा असलेल्या मंदिराची प्रतिकृती विक्रीला आली आहे. या सोबतच चांदीपासून तयार केलेल्या श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती उपलब्ध करून देण्यासह सुवर्ण मुलामा असलेली व आकर्षक साज चढवलेली मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय सुवर्ण मुलामा असलेले श्रीराम पादुका घेण्याकडेही ग्राहकांचा कल असून घरोघरी त्याचे पूजन केले जाणार आहे. या शिवाय नियमित सोने-चांदीचे शिक्के तर आहेच, मात्र या वेळी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान असलेल्या शिक्क्यांना जास्त पसंती दिली जात आहे.

दररोज शेकडो वस्तू ग्राहकांच्या घरीश्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह सुरू झाला तेव्हापासून या वस्तू जळगावात दाखल झाल्या आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यात मोठी उलाढाल वाढली आहे. शनिवार व रविवारी तर शेकडो ग्राहकांनी या वस्तू खरेदी केल्या. रामभक्तांचा उत्साह पाहता सोमवार, २२ जानेवारी रोजी तर यात आणखी भर पडण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवली आहे. ५५० रुपयांपासून श्रीराम पादुका असून पाच हजार ५०० रुपये किमतीपर्यंत विविध वस्तू ग्राहक खरेदी करत आहेत. यातून दोन दिवसात लाखोंची उलाढाल झाली आहे.