शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 15:15 IST

१३ गावांना टंचाईचा चटका, चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत

कुंदन पाटील

जळगाव : चाळीसगाव तालुक्याला दिवसेंदिवस पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. गेल्या चार दिवसात टॅंकरच्या संख्येत २ ने वाढ झाली आहे. या तालुक्यात १३ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत. या तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांचीही परिस्थिती नाजूक असून रब्बीला फटका बसण्याची शक्यता आहे. तशातच १३ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या १३ गावात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तर २ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या तालुक्यालावगळता जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात टॅंकरेद्वारे पाणीपुरवठा होत नाही. 

भूजलपातळीतही घटचाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळी १.५२ मीटरने घटली आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर या तालुक्याला दुष्काळाची झळ सहन करावी लागणार आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर व भडगाव तालुक्यातही पाणीपातळीत घट निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणांमधील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्याला प्रशासन प्राधान्य देणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपात