शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले

By सुनील पाटील | Updated: November 8, 2022 14:23 IST

सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे.

जळगाव : शहरातील सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्सच्या शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचे दागिने तसेच २० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. वडिल घीसुलाल वर्मा व भाऊ विजय हे देखील दुकानाचे कामकाज बघतात. सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर रात्री साडे आठ वाजता दुकान बंद करुन तिघं जण घरी जातात. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यावर सर्व जण घरी गेले. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता शेजारील कमल ज्वेलर्सचे मालक कमल शर्मा यांनी ललीत यांना फोन करुन दुकान उघडे व शटरची पट्टी तुटलेली असल्याचे कळविले.

ललीत यांनी दुकानात धाव घेतली असता  शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले होते. सीसीटीव्हीची वायर कापण्यात आली होती व डीव्हीआर काढलेला दिसला. दुकानाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली २० हजाराची रोकड तसेच ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातल्या १२ जोडी, सोन्याच्या पेंडलचे १२ नग, एक किलो चांदी त्यात विविध प्रकारचे नगर आदी ऐवज गायब झालेला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

शनी पेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र पाटील, संजय शेलार, अनिल कांबळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपअधीक्षक संदीप गावीत यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच अंगुली मुद्राच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ललीत वर्मा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRobberyचोरी