शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात बिबट्याचा बछडा अडकला पॉलिहाउसच्या जाळीत; वनविभागाने सोडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 22:03 IST

गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जिजाबराव वाघ -

चाळीसगाव : शिकार शोधण्यासाठी बुधवारी (दि. १२) रात्री निघालेला ७ ते ८ महिन्यांचा बिबट्याचा बछडा पॉलिहाउसच्या जाळीत अडकला. गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

तिरपोळ - वरखेडे रस्त्यालगत संजय पाटील या शेतकऱ्याचे शेत असून, पॉलिहाउस केले आहे. बुधवारी रात्री पॉलिहाउसकडे आलेला बिबट्याचा बछडा या जाळीत अडकला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पाटील यांच्याकडील कामगार पॉलिहाउसमध्ये गेल्यानंतर हा बछडा त्यांच्या नजरेस पडला. बछडा त्यांच्याकडे पाहून गुरगुरला. यानंतर या कामगाराने तेथून पळ काढला.

संजय पाटील यांनी चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळविले. वनविभागाने आपल्या टीमसह घटनास्थळी येऊन दोन तास प्रयत्न करीत बछड्याची जाळीतून सुटका केली. सुटका होताच बछड्याने शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली.

शेतकऱ्यांचा रोष; वनविभागाने काढली समजूत -सद्यस्थितीत शेतात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. त्यामुळे वनविभागाने बछड्याला पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वनविभागाने बछड्याला सोडून दिल्याने रोषही व्यक्त केला. यावर ७ ते ८ महिन्यांच्या बछड्याची आईसोबत चुकामुक झाल्याने तो पॉलिहाउसमध्ये अडकला. त्याला पकडल्यास त्याची आई मादी बिबट्याने परिसरात नागरिकांवर हल्ले केले असते. असा मुद्दा शीतल नगराळे यांनी मांडला. शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा रोष मावळला. 

टॅग्स :leopardबिबट्याChalisgaonचाळीसगाव