शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी फटका, सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दरही वधारले

By विजय.सैतवाल | Updated: April 1, 2023 14:56 IST

तयार दागिन्यांवरही कराचा भार वाढला

जळगाव - सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सातत्याने वाढ होत गेलेल्या चांदीच्या भावात १ एप्रिल रोजी पुन्हा ६५० रुपयांची वाढ होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. गेल्या १० दिवसांमध्ये चांदीत तर तीन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्याही भावात १० दिवसांपासून वाढ सुरू असून १ रोजी ते ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर राहिले. 

नवीन आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिलपासून सोने, चांदीच्या इमीटेशन ज्वेलरीवर आयात शुल्क वाढविल्याने त्यांचे भाववाढीचे संकेत दिले जात होते.  मात्र या तयार दागिन्यांसह गेल्या १० दिवसांपासून सोने-चांदीतही वाढ गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढत असल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

१० दिवसांपूर्वी २२ मार्च रोजी ६९ हजार रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात २३ रोजी ८०० रुपयांची वाढ झाली. २४ रोजी पुन्हा २०० रुपयांची वाढ झाली व २५ मार्चपर्यंत ती ७० हजारांवर स्थिर राहिली. २६ रोजी पुन्हा ५०० रुपये, २९ व ३० रोजी प्रत्येकी ३०० रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजारांवर पोहचली. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्च रोजी पुन्हा ८५० रुपये तर १ एप्रिल रोजी ६५० रुपयांची वाढ होऊन चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. अशाच प्रकारे २२ मार्च रोजी ५९ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते १ एप्रिलपर्यंत ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.

टॅग्स :Goldसोनं