शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

चाळीसगावकर ‘प्राजंक्स’च्या गुणवत्तेचा ठसा अमेरिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

चाळीसगाव : शिक्षणातील गुणवत्तेला मर्यादा नसतात. सीमांचे बंधनही नसते. चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने हेच सिद्ध करीत थेट अमेरिकेतच ...

चाळीसगाव : शिक्षणातील गुणवत्तेला मर्यादा नसतात. सीमांचे बंधनही नसते. चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने हेच सिद्ध करीत थेट अमेरिकेतच आपल्या गुणवत्तेचा ठसा कोरला आहे. कोरोनाकाळात अमेरिकेतच राहून त्याने रोबोटिक्स व्हरसिस्टर परीक्षेत पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. त्याच्या शिक्षण यशाने चाळीसगावचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार रोवला आहे. प्राजंक्सच्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील जुने सराफ व्यावसायिक सोमनाथ शंकर सराफ यांचा प्राजंक्स हा नातू. त्याचे वडील संजय चाळीसगावातच सराफ व्यवसाय करतात. प्राजंक्स बालपणापासूनच अभ्यासू असल्याचे त्याचे वडील संजय सराफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याचे १२ वीपर्यंतचे शिक्षण चाळीसगावीच झाले.

...........

चौकट

हुबळी ते अमेरिका आणि प्रथम क्रमांक

१२ वीनंतर रोबोटिक्स व्हरसिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी प्राजंक्स कर्नाटकमधील हुबळी येथे गेला. येथे दोन वर्षे त्याने याच शिक्षणाचे धडे गिरवले. यानंतर रोबोटिक्स व्हरसिस्टर शिक्षणासाठी त्याने अमेरिकेत पाय ठेवला. प्राजंक्सला एक लहान भाऊ व बहीण आहे. त्याची आई शंकुतला या गृहिणी आहेत.

........

चौकट

कोरोनाकाळात रोवली यशाची पताका

प्राजंक्स गेली चार वर्षे अमेरिकेतच असून, गेल्या वर्षापासून कोरोनाने जग व्यापले असतानाही त्याने आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. कोरोनाकाळात तो अमेरिकेतच होता. याच काळात त्याने जिद्दीने अभ्यास करून ‘मेसेनझ्युटिअर युनिव्हर्सिटीमधून रोबोटिक्स व्हरसिस्टर’मध्ये एमएसची पदवी पूर्ण करताना पहिल्या क्रमांकाचा झेंडा रोवला.

.........

इन फो

जगाचे रहाटगाडे सुखाचा रस्ता आला तरी धावतेच आणि संकटांनी वाट अडवली म्हणून थांबत नाही. शिक्षणाचेही तसेच आहे. विचलित न होता त्याचे बोट धरून चालत रहायचे. जीवतोड मेहनत करायची. यश शंभर टक्के मिळतेच. कोरोनाचा खडतर काळ आणि परीक्षा असा मेळ घालत अभ्यास केला. जराही विचलीत झालो नाही. पहिला क्रमांक मिळाला, याचा आनंद मोठाच आहे.

-प्राजंक्स संजय सराफ

===Photopath===

240521\24jal_6_24052021_12.jpg

===Caption===

प्राजंक्स सराफ