शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कुलस्वामिनीच्या कुळोत्सवातील वहीगायनाची थाप सोडतेय लोकसंगीताची छाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:02 IST

वह्या ढोलकीच्या व डफावर थिरकणारी थाप देत गाण्याची लोकसंगिताची लोकपरंपरा आजही आपली थाप या कुळाचारात कायम ठेवून आहे. 

ठळक मुद्देमार्गशीर्ष, माघी व फाल्गुनी पौर्णिमोत्तर शुक्रवारी कुळाचारात भाऊबंदकीचा फुलतोय मेळाडफावर थिरकणारी थाप देत गाण्याची लोकसंगिताची लोकपरंपरा आजही कायम

किरण चौधरीरावेर : प्रत्येक परिवाराचे कुलदैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी, श्री रेणुका माता, श्री सप्तश्रृंगी माता, श्री जोगेश्वरी माता, श्री एकवीरा माता यांचा कुळाचारातील मार्गशीर्ष शु।।, माघ शु।। व फाल्गुन शु।। पौर्णिमेनंतर येणार्‍या शुक्रवारी साजरा करण्यात येत असलेल्या कुलोत्सवात वहीगायनातील ढोलकी व डफावरची थिरकणारी थाप कुलस्वामिनीच्या महिमा गाताना आजही समाजमनात आपल्या लोकसंगिताची छाप आजही कायम आहे. किंबहुना, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही कुळाचारात भाऊबंदकीचाही मेळा फुलत असल्याची बाब समाजमनासमोर आदर्श उभा केला आहे.      खान्देशवासीयांच्या कुळाचारात कुलदेवतेचा कुलोत्सव मार्गशीर्ष, माघ व फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेनंतर येणार्‍या शुक्रवारी साजरा करण्याची प्रथा आजही रूढ आहे. किंबहुना, या कुलस्वामिनीच्या कुलोत्सवानिमित्तच वहीगायनाची लोकपरंपरा अविरतपणे जोपासली आहे.       माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वृद्धाश्रमाची परंपरा व विभक्त कुटुंबांच्या भिंती वाढीस लागली असताना, मात्र कुलदेवतेच्या चरणी शरण येण्यासाठी कुलोत्सवात दरी मिटून एकत्र येणार्‍या भाऊबंदकीचा मेळा फुलत असल्याचे वैशिष्ट्य दिसून येते.          किंबहुना, कुलोत्सवाचा कुळधर्म गुरूवारी रात्री सामूहिक भोजनाने सुरू होत असतो. शुक्रवारी सकाळी कुलदेवतेचे सुपूजन केल्यानंतर साखर म्हणून संबोधली जाणारी खीर, पुरणपोळी, लाडकं म्हणून संबोधले जाणारे वांग्यांचे फोळणी न देता भाजलेले भरीत व हरभरा डाळीचे वाफेवर फुलववेली नारळ असा महाप्रसाद तयार करण्यासाठी भाऊबंदकीतील सुवासिनी एकत्र येऊन महाप्रसाद तयार केला जातो.       दरम्यान, कुलदेवतेच्या महापूजेत आवश्यक असलेली कुंभाराच्या घरची मातीची भांडी असलेली " रत्न " आणण्यासाठी वहीगायनाची परंपरा आजही जोपासली जात आहे. ढोलकी व डफावर थिरकणारी थाप, तथा चोंडकी वादकाच्या तुणतुणणार्‍या मंजूळ स्वरात कुलस्वामिनीच्या महिमा असलेल्या वह्या, कथानकासह उंच सुरेल स्वरातील वहीगायकाने गायलेली वही व त्यांना साथसंगत देणार्‍या जिलकरींचा प्रतिसादही झिम्मा फुगडी खेळाच्या तालात कुलदेवतेच्या नामस्मरणात रममाण करून जातात.        "आईची येण्याची झाली तयारी अन् रत्न घेण्याची झाली तयारी..." , " गडाची अंबा निघाली नी पुजारी डोलायला लागली..." , " आजुबाजूने डोंगरझरी नी कानबाई माझी फुगडी खेळी " , " कसा करू मी शृंगार बाई मायबाईचा.." , " कानबाई चालली गंगेवरी नी साखर पेरत चालली.." "माळ्याच्या मळ्यामंधी सुपारी हिचे बनं.. " जायाचं वणीच्या गडाला, जाऊ द्या मला..", " कान्होळ चालली कण्हेराला..." अशा कुलस्वामिनीचा महिमा असलेल्या वह्या ढोलकीच्या व डफावर थिरकणारी थाप देत गाण्याची लोकसंगिताची लोकपरंपरा आजही आपली थाप या कुळाचारात कायम ठेवून आहे.        खानापूर येथील नवरंग वही मंडळातील वहीगायक सुरेश पाटील, पंडित चौधरी, सचिन तेली, गोकुळ राजपूत, मुकेश राजपूत, विक्रम राजपूत, रवींद्र राजपूत, ढोलकी सुधाकर ढोलकी व भागवत कोळी (अजनाड ), चोंडकीवादक अशोक धांडे यांनी आजही आपली परंपरा कायम राखली आहे. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर