शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

दिलासा..... तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:18 IST

नवीन आवक वाढल्याचा परिणाम : तूर डाळ १००० ते ११००, हरभरा डाळ १००० ते ११०० तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी

जळगाव : रब्बी हंगाम चांगला असल्याने नवीन कडधान्याची व डाळींची आवक वाढल्याने तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तूर डाळीचे १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ७७०० ते आठ हजार रुपये, हरभरा डाळ १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ५००० ते ५४०० रुपयांवर तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून अति पावसामुळे डाळींचे भाव जास्त राहण्याची चिंताही दूर झाली आहे.देशातील डाळ निर्मितीमध्ये जळगावचा मोठा वाटा असून येथे तयार झालेली डाळ देशातील विविध भागासह विदेशातही निर्यात होते. त्यामुळे कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो. हल्ली महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येऊ लागल्याने डाळींचे उत्पादन वाढल्याने डाळींचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.रब्बी हंगामाची साथअति पावसामुळे यंदा उडीद-मुगाला मोठा फटका बसला व या डाळींचे भाव दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यात मूग डाळीने शंभरी पार केली तर उडीद डाळही नव्वदीच्या पुढे गेली. त्यामुळे रब्बी हंगामात तूर व हरभरा चांगला येऊन भाव कमी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार यंदा सर्वत्र चांगले पाणी असल्याने व थंडीचेही प्रमाण चांगले असल्याने हरभरा व तुरीचे चांगले उत्पादन आले.बाजारात आवक वाढलीरब्बी हंगाम चांगला आल्याने बाजारात हरभरा व तूर डाळीची आवक सुरू झाली आहे. जळगावात दररोज १० ते १५ टन तुरीच्या डाळीची आवक होत असून हरभरा डाळदेखील सात ते आठ टनापर्यंत पोहचली आहेत. जळगावातील दालमिलसह तुरीची डाळ लातूर, परतवाडा, अकोला, मलकापूर येथूनही येत आहे. अशाच प्रकारे दिल्ली, मध्यप्रदेशातून हरभरा डाळ येत आहे.चिंता दूरचार वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव दोनशे रुपये प्रती किलोच्या पुढे गेल्याने सर्वच चिंतीत झाले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षापासून कमी झाले. मात्र यंदा अति पावसामुळे उडीद, मुगाच्या डाळींचा अनुभव पाहता वर्षभराच्या धान्य खरेदी वेळी तूर डाळीचेही भाव कडाडता की काय, अशी चिंता होती. मात्र आवक वाढल्याने भाव कमी झाले व सर्वांची चिंताही दूर झाली आहे.भावात घसरणगेल्या आठ ते दहा दिवसांच्या तुलनेत डाळींचे भाव चांगलेच घसरले आहे. ८००० ते ९००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूर डाळीच्या भावात १००० ते १३०० रुपयांनी घसरण ती आता ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीच्या भावात १००० ते ११०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ५००० ते ५४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे तर दहा हजार ते १०,५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या उडीद डाळीच्या भावात १६०० ते २००० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे.मुगाची डाळ मात्र खातेय ‘भाव’तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात घसरण झाली असली तरी मूग डाळ मात्र अजूनही ‘भाव’ खात आहे. ९६०० ते १०,००० रुपये प्रती क्विंटलवर असलेली मुगाची डाळ त्याच भावावर स्थिर आहे. अतिपावसामुळे मुगाला मोठा फटक बसल्याने आवकच कमी आहे, त्यामुळे या डाळीचे भाव कमी होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.यंदा रब्बी हंगामात कडधान्याचे चांगले उत्पादन आल्याने सध्या डाळींची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे डाळींचे भाव कमी झाले आहे.-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव