शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराणा प्रताप‘च्या गणपतीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:34 IST

महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या गणपतीचे २६ रोजी साधेपणाने विसर्जन करण्यात आले.

भुसावळ : येथील महाराणा प्रताप विद्यालयातील पाच दिवसांच्या गणपतीचे २६ रोजी साधेपणाने विसर्जन करण्यात आले. शाळेच्या आवारातच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.गणेशोत्सव म्हटला की विद्यालयात दरवर्षी मोठा जल्लोष असतो. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असतो. दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे विविध कलागुण दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. एखादा समाजप्रबोधन करणारा विषयावर आधारित आरास केली जाते.विसर्जनाच्या दिवशी भव्य व शिस्तबद्ध मिरवणूक काढली जाते. यात विद्यार्थ्यांचे लेझीम, झांज, दिंडी, संतांची वेशभूषा, झेंड्याची कवायत इत्यादी पथक मिरवणुकी मध्ये सामील असतात. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी काही दिवस आधी सराव करतात. मिरवणुकीमध्ये पारंपारिक ढोल व ताशे ही वाद्ये असतात. विसर्जन मिरवणुकीचे, मार्गावर ठिकठिकाणी स्वागत होते व काही दाते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे परंपरेप्रमाणे काही कार्यक्रम घेता आले नाही. तरी परंपरा खंडित न होता उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.या वर्षी आराससाठी औषधी वनस्पतींची माहिती हा विषय घेऊन गुळवेल, आंबेहळद, पानफुटी, अडुळसा, वेखंड या औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष रोपे ठेवून त्यांच्याबद्दलची माहितीचे फलक लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वेशभूषा, घरगुती गणपतीची आरास इत्यादी स्पर्धांचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचाही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ