शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या अपघातानंतर तातडीने गटार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:06 IST

दोन महिन्यांपासून साध्या गटारीचे काम पूर्ण होईना, एकाच रस्त्याने सुरु आहे दुहेरी वाहतूक 

जळगाव :  आमदार सुरेश भोळे यांना गुरुवारी सकाळी  अपघात झाल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आणि शुक्रवार सकाळीच  तातडीने अपघात झालेल्या ठिकाणची गटार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.  या ठिकाणी जेसीबीसह ठेकेदाराचे कर्मचारी  दाखल झाले आणि कामालाही सुरूवात झाली.  आमदार सुरेश भोळे यांची दुचाकी घसरल्याने ते खाली पडले आणि त्यात त्यांना मुकामार लागला.   खड्डयांमुळे अपघात झाल्याचे सोशल मीडियावर  सांगितले जात आहे. मात्र, ‘लोकमत’ च्या टीमने  शुक्रवारी अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली असता, त्या ठिकाणी खड्डा नव्हता. ृ मात्र, दोन महिन्यांपासून याच ठिकाणी गटारीच्या दुरुस्तीचे काम सुरु असून हा रस्ता खोदण्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुश्रुत बर्न केअर सेंटरसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद असून कामिनी कमल हॉस्पिटल समोरच्या एका बाजूच्या रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरु आहे. याच रस्त्यावरून येत असताना अचानक आमदार भोेळे यांच्या दुचाकी समोर काही विद्यार्थी सायकलवरून आल्याने त्यांची दुचाकी घसरुन  त्यांचा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महेश चौधरी (शिवाजीनगर) यांनी दिली.छटाकभर कामासाठी दोन महिन्यांचा काळ या रस्त्यावरील गटारीच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्ता देखील खोदून ठेवण्यात आला आहे.  दुरुस्तीचे काम मात्र थांबले होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर कामाला वेग आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा काम थांबले होते. बहिणीच्या निधनानंतर आमदारांवर दुसरी आपत्ती १ सप्टेंबर रोजी आमदार सुरेश भोळे यांच्या भगिनी सुनंदा जंगले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाची आपत्ती कोसळली होती. त्या दु:खातून सावरत असताना अचानक गुरुवारी त्यांचा अपघात झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना आमदारांचा अपघात झाला. सुदैवाने त्यांना गंभीर इजा नसल्याने काही दिवस आराम केल्यानंतर पुन्हा कामाला लागू शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे. 

 रिंगरोडवर सुरु असलेल्या कामाबाबत माहिती नाही, बांधकाम विभागाकडून कामाची माहिती मागविण्यात आली असून, काम थांबले असेल तर कामाला काय अडचणी याची माहिती घेतली जाईल.-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त गटारीच्या कामास अनेकवेळा तांत्रिक अडचणी येत होत्या. सततच्या पावसामुळे काम सुरु होण्यास अडचण येत असतील. दरम्यान,  आज ती अडचण दुर झाली  असल्याने मक्तेदाराने काम सुरु केले असावे.-सुनील भोळे, बांधकाम अभियंताआमदार सुरेश भोळे यांचा अपघात हा खड्डयांमुळे झालेला नाही. पावसामुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. तसेच रिंगरोड जे काम सुरु आहे ते काम तत्काळ सुरु करून पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु असल्याने अनेकदा वाहतुकीला अडचण येते. -डॉ.अश्विन सोनवणे, उपमहापौर आमदार भोळे यांच्या छातीला मुकामार लागला आहे.  डोक्यालाही जखम झाली आहे. त्यामुळे अजून तीन ते चार दिवस देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. चार दिवसानंतरच घरी जावू देण्यात येईल तरीही त्यांना काही दिवस आराम करावा लागेल.-डॉ.अर्जुन भंगाळे

टॅग्स :Jalgaonजळगाव