शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मयत आरपीएफ कर्मचाऱ्याच्या पत्नीस रेल्वेतर्फे तत्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:06 IST

रेल्वेत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले आरपीएफ कर्मचारी चंद्रकांत अढालकर यांच्या कुटुंबियांना ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शनसह तत्काळ आवश्यक ती मदत करण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाची तत्परताकेवळ ४८ तासात पेन्शनसह आवश्यक ती मदत प्रदान

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले आरपीएफ कर्मचारी चंद्रकांत अढालकर यांच्या कुटुंबियांना ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शनसह तत्काळ आवश्यक ती मदत करण्यात आली.येथील रेल्वे यार्डातील आरपीएफ विभागात प्रधान आरक्षक पदावर कार्यरत चंद्रकांत त्र्यंबक अढालकर हे कार्यरत होते. दि.१५ मे रोजी सावदा रेल्वे स्थानकावर गुन्हे रोखणे व गाड्यांचे सील तपासणे अशी सेवा बजावत होते. यादरम्यान मालगाडीची तपासणी करीत असताना प्रधान आरक्षक चंद्रकांत अढालकर यांचा दुपारी २-३२ वाजता खांब क्रमांक कि.मी. ४५९/२९-३१ जवळ गाडी क्रमांक १३२०१ ची जबर धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला होता. दि.१६ मे रोजी प्रधान आरक्षक चंद्रकांत त्र्यंबक अढालकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परिवारास सर्व अनुदान रक्कम ग्रॅज्युएटी, पेंशन, प्रोव्हिडंड फंड, विमा आदी ४८ तासात कागदपत्रांची पूर्तता करून विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते मयत चंद्रकांत अढालकर यांच्या विधवा पत्नी कल्पना अढालकर यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्यासह अन्य आरपीएफ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ