शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:46 IST

रस्ता सुरक्षा समिती बैठक : तपासणी करुन गतिरोधक हटविण्याच्या सूचना

जळगाव : रस्ते सुरक्षेत कुठलीही तडजोड न करता प्रादेशिक परिवहन विभागाने एक धडक मोहिम उभारून सर्व वाहनांची सखोल तपासणी करावी. तपासणी मोहिमेत आढळून आलेल्या अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करण्याच्या सूचना गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.गुरूवारी त्यांच्या दालनात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. त्याप्रसंगी त्यांनी परिवहन, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांना सूचना केल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, नहीचे अधिकारी सी.एम.सिन्हा, हितेश अग्रवाल, शिक्षणाधिकारी डॉ.डी.एस.देवांग, सा.बां.विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता विलास पाटील, विद्युत मंडळाचे एस.एस.साळुंखे, मनपाचे अतिक्रमण विभागाचे एच.एन.खान आदी अधिकारी उपस्थित होते.अनधिकृत गतीरोधक त्वरित काढाडॉ.ढाकणे यांनी अनधिकृत गतिरोधकांची तात्काळ पाहणी करून ती काढून टाकण्याच्या सूचना महानगरपालिकेचे अभियंता भोळे यांना केल्या. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गालगत असलेली रहिवासी, दुकाने किंवा आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत असलेली अतिक्रमणे, रस्त्यात वाहने उभी करणे असे प्रकार सर्व संबंधितांनी पोलिसांची मदत घेवून थांबवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या़अपघातांना खराब रस्त्यांसह खड्डेही कारणीभूतउप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी गतवर्षाच्या तुलनेत अपघातात तब्बल १५ टक्यांनी झालेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करून यावर सर्वांनी सर्वसमावेशक चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणाला नादुरूस्त वाहने, बेशिस्त वाहन चालविण्याऱ्या बरोबरच खराब रस्ते किंवा त्यावर पडलेले खड्डेही कारणीभूत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव