शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची प्रतिमा होतेय मलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:06 IST

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट ...

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट मधील बोगस नियुक्ती याद्या ही सगळी प्रकरणे खूप गाजली मात्र आकाश झाकाळून जावे आणि मेघांचा प्रचंड गडगडाट व्हावा... परंतु पाऊस न पडता झाकाळलेले आकाश पुन्हा निरभ्र व्हावे... असाच अनुभव या प्रकरणांमध्ये आला. जणू काही झालेच नाही.. असा या प्रकरणांचा शेवट झाला. कारवाई काही झालीच नाही. अपंग युनीट प्रकरणात बोगस नियुक्ती याद्या तयार झाल्या परंतु कोणासही नियुक्ती दिली नाही, म्हणजे फसवणूक झाली नाही... असा अर्थ काढून गुन्हा दाखल झाला नाही. खूप ओरड होत असताना उपयोग होत नसल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केल्याने शिक्षण मंत्री तावडे यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी होईल, असे जाहीर केले मात्र जवळपास दोन महिने उलटूनही कार्यवाही झाली नाही. नुकतीच बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा पाचोरा तालुक्यात झाल्याची तक्रार आल्यावर स्थायी समिती सभेत पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा ठराव होवूनही गुन्हा दाखल होवू शकला नाही. खराब पाकिटे बदलून दिल्याने गुन्हा दाखल होवू शकत नाही, असा निर्णय पोलिसांनी दिला. परंतु खराब शेवया खाण्यात येवून मुलांच्या आरोग्यास हानी पोहचली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते ? या प्रश्नावर मात्र हानी पोहचली असती तर गुन्हा दाखल होवू शकला असता असे मत व्यक्त होत आहे. परंतु एकीकडे चोरी केली तर गुन्हा दाखल होतोच परंतु चोरीचा प्रयत्न केला तरीही गुन्हा दाखल होतो. मग अशा प्रकरणांमध्ये गुन्हा घडण्याची वाट का पाहिली जाते ? अपंग युनीट प्रकरणात फसवणूक झाली नाही असे म्हटले तरी फसवणुकीचा प्रयत्न निश्चित झाला आहे. शेवया प्रकरणात कोणास हानी पोहचली नसली तरी पुरवठादारांचा हलगर्जीपणा गंभीर आहे, यामुळे गुन्हा दाखल का केला जात नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याप्रकारे एकूणच ही प्रकरणे जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा संशय मात्र दिवसेंदिवस नागरिकांमध्ये बळावत आहे. कोण जबाबदार हे स्पष्ट होत नसले तरी प्रशासनाची आणि शासनाचीही प्रतिमा यात मलीन होत आहे हे निश्चित. परंतु याची कोणालाही फिकीर नाही.. हे दुर्दैव आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव