शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील वाघझिरा येथे अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 20:00 IST

यावल , जि.जळगाव : तालुक्यातील वाघझिरा गावाजवळ सागवानी लाकडासह अवैध बांबू व त्यापासून तयार केलेले साहित्य असा सुमारे ५१ ...

ठळक मुद्देवनविभागाच्या गस्ती पथकाकडून ५१ हजार रुपये किमतीचा माल जप्ततस्करांंनी माल नाल्यात ठेवला होता लपवूनपाठलाग केल्यानंर तस्कर पळण्यात यशस्वी

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील वाघझिरा गावाजवळ सागवानी लाकडासह अवैध बांबू व त्यापासून तयार केलेले साहित्य असा सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केला आहे.अवैध सागवानी लाकूड व बांबू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून पथकाने वाघझिरा गावाजवळ जंगलात पाळत ठेवली. सातपुड्यातून बांबू व त्यापासून तयार केलेले बांबू टोपले येत असताना दिसले. वनविभागाचे गस्तीपथक दिसताच चोरटे मुद्देमाल टाकून पसार झाले. वनविभागाने त्यांचा पाठलाग केला. तेव्हा आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. नाल्याजवळ सागाचे पाच नग व ११ हजार १०० बांबू लपवून ठेवलेले होते. मुद्देमाल जप्त करून यावल डेपोत खासगी वाहनाने आणून यावल डेपोत जमा केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वनपाल वाघझिरा करीत आहेत.जप्त केलेल्या मालामध्ये पाच हजार रुपयाचे किमतीचे ०.०५८ घनमीटर आकाराचे चार कटसाईज सागवान, ५०० रुपये किमतीची एक साग दांडी, नऊ हजार रुपये किमतीच्या बांबूच्या १० तयार ताट्या, नऊ हजार रुपये किमतीच्या बांबूच्या ५८ टोपल्या व अडीच हजार रुपये किमतीचे ११ मोठे टोपले, १६ हजार ६५० रुपये किमतीचे एक हजार १४० बांबू असा एकूण ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर व धुळे विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील वनपाल सुनील पाटील, वनरक्षक संदीप पंडित, रवींद्र बी.पवार, पो. कॉ. सचिन तडवी , वाहनचालक भरत बाविस्कर यांनी केली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागYawalयावल