शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:06 IST

अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देफैजपूर : ६ लाखाचे वाहन जप्तदीड लाखाचे गुरे गोशाळेत रवाना

फैजपूर, ता.यावल : भुसावळ रोडवरील आमोदा बामणोद गावाजवळ २२ रोजी मिनीट्रकचा अपघात झाल्याची घटना पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन गुरांना गोशाळेत रवाना केले. सहा लाखाचे वाहन व त्यात दीड लाखाची गुरे असल्याचे पोलिसांनी सांगितले.सूत्रांनुसार, आमोदा-बामणोद दरम्यान मिनी ट्रक (क्रमांक आरजे-१४-जीई-८४६६) या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करीत असताना त्यात गुरे असल्याची बाब उघड झाली. पोलिसांनी यासंदर्भात अधिक चौकशी केली. गुरांचे तोंड व पाय बांधून विना परवाना व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्राशिवाय अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सहा लाखांचे अपघातग्रस्त वाहन तसेच दीड लाखाची नऊ गुरे व त्यात तीन वासरे असल्याचे पोलिसांनी सांगत गुरांची गोशाळेत रवानगी केली.घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी भेट दिली. यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल किरण चाटे यांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक मात्र अद्याप कोणाला झाली नसल्याचे सांगण्यात आले. तपास सपोनि प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातFaizpurफैजपूर