शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-बोदवड रस्त्यावर अवैध गौणखनिज वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:21 IST

जळगाव-बोदवड रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या डंपरने कुºहे (पानाचे) येथे डंपरने रात्रीच्या वेळेस पुलाला धडक दिली.

ठळक मुद्देकुºहे पानाचे गावाजवळ पुलाला दिली धडक ग्रामस्थांचे प्राण धोक्यात

भुसावळ, जि.जळगाव : जळगाव-बोदवड रस्त्यावर रेतीची सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. भरधाव धावणाऱ्या या डंपरने कुºहे (पानाचे) येथे डंपरने रात्रीच्या वेळेस गावाशेजारील पुलाला जोरदार धडक दिली. ही घटना मंगळवारी घडली. सुदैवाने या घटनेत अप्रिय घटना घडली नाही. मात्र यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जळगाव-बोदवड रस्त्यावरून दररोज शेकडो डंपर भरधाव वेगाने अवैध गौणखनिज व रेतीची सर्रास वाहतूक करीत आहे. कुºहे (पानाचे) गावाजवळून भरधाव वेगाने डंपर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी एका डंपरने रात्रीच्या वेळेस गावाशेजारील मारुती मंदिराजवळील फुलाला जोरदार धडक दिली. यावेळी तरीही डंपर न थांबता तीन-चार वीज खांबानाही धडक देऊन ओढत नेले. मात्र तरीही डंपर थांबले नाही. फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, सहा महिन्यापूर्वी ही याच रस्त्यावर गावाशेजारी एका मोटारसायकल वाल्याला धडक देऊन डंपर फरार झाले होते. यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनला मोटरसायकल जमा करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाला किंवा नाही यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही, तर फुलाच्या जवळपासच एका पायी जाणाºया शेतकºयालाही भरधाव येणाºया डंपरने चिरडले होते. तरीही ही महसूल व पोलीस प्रशासनाने या डंपरचा बंदोबस्त केलेला नाही.दरम्यान, डंपरवर केवळ १६ ते १७ वयोगटातील अज्ञान बालके चालकाची भूमिका बजावत आहे, डंपरच्या मागे किंवा पुढे ठेकेदाराचे चार ते पाच गुंड प्रवृत्तीच्या लोक चार चाकी वाहनाने जात असल्याचे दिसून येते. गुंडाच्या खास बंदोबस्तात अवैध रेती व वाळूच्या गाडी नेत असल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन कधी लोभ तर कधी भीतीपोटी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.तरी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या डंपराचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ