शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुनसगाव येथे अवैध वाळूसाठा, गौणखनिज खदान सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:41 IST

सुनसगाव येथे गौणखनिजाची अवैध खदान आणि सुमारे तीन हजार अवैध वाळू साठा सापडला आहे.

ठळक मुद्देपहूर सर्कलची कारवाई कंपनी कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद उफाळला

सचिन पाटीलनेरी ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळ असलेल्या सुनसगाव येथे गौणखनिजाची अवैध खदान आणि सुमारे तीन हजार अवैध वाळू साठा सापडला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पहूर मंडळ अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत तीन डंपर व एक पोकलॅन मशीन जप्त केले. यावेळी पोलीस पाटील यांना अरेरावी केल्याने ग्रामस्थ व कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होवून मोठा वाद उफाळला होता. मात्र कंपनीचे प्रोजेक्ट मनेजर पी.व्ही.श्रीनिवास यांनी जाहीर माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. शुक्रवारी सायंकाळी सातला हा प्रकार घडला.जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम स्पायरोडारा इन्फ्रास्टक्चर ही कंपनी करत आहे. या कामासाठी कंपनीने सुनसगाव येथे एका प्रशस्त शेतात आपला कॅप सुरू केला आहे. गावाच्या मागे वाघूर नदीला लागून कंपनीने गौणखनिजाची एक खदान सुरू केली आहे. या खदानीतून दररोज हजारो ब्रास मुरूम, खडी तयार करून वापरली जाते. मात्र ही खदानच अवैध पद्धतीने सुरू असल्याची माहिती शुक्रवारी जामनेर तहसीलदारांना गावातील काही नागरिकांनी दिली. तसेच या ठिकाणी अंदाजे जवळपास तीन हजार ब्रास वाळूसाठादेखील मोठी शक्कल लढवून लपवण्यात आला होता.तहसीलदारांच्या आदेशाने पहूर मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर आणि स्थानिक तलाठी पृथ्वी भिवसने यांनी पंचनामा केला व येथे मुरुमाचे भरलेले तीन डंपर आणि एक पोकलॅन मशीन जप्त करून कंपनीच्या आवारात जमा केले. कागदपत्रे कंपनीने सादर केल्यानंतर पुढील कारवाई आणि दंड निश्चित केला जाईल, असे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले.दुसरीकडे मात्र हा पंचनामा सुरू असताना कंपनीचे काही कर्मचारी आणि गावातील नागरिकांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होत असताना पोलीस पाटील समाधान महाजन यांनी नागरिकांना शांत केले. कंपनीचे प्रोजेक्ट मनेजर पी.व्ही. श्रीनिवास यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, खदानीची पाहणी केली. या ठिकाणी अंदाजे तीन हजार ब्रास वाळूसाठा आढळला. तसेच गौणखनिजाची खदानदेखील आढळून आली. येथे मुरूमने भरलेले तीन डंपर आणि एक पोकलॅन मशीन जमा करण्याची कारवाई सुरू आहे. अधिकृत कागदपत्रे सादर झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.-प्रशांत निंबाळकर, मंडळ अधिकारी, पहूरगैरसमजुतीमधून सदर प्रकार घडला आहे. आम्ही याप्रकरणी खेद व्यक्त करत संबंधितांची माफी मागितली आहे. वाळूसाठा आणि खदानीचे योग्य कागदपत्रे सादर केली जाईल.-पी.व्ही.श्रीनिवास, प्रोजेक्ट मनेजर, स्पायरोडारा इन्फ्रास्टक्चरकंपनीच्या एका कर्मचाºयाने अरेवारी केल्याने गावातील तरुण संतापले होते. त्यामुळेच हा वाद निर्माण झाला होता. मात्र श्रीनिवास यांनी माफी मागितल्याने हक वाद संपला आहे.-समाधान महाजन, पोलीस पाटील, सुनसगाव 

टॅग्स :sandवाळूJamnerजामनेर