शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील अंंधारीसह परिसरात अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:59 IST

अवैध वाळू उपसा मन्याड नदीतून रात्री व दिवसा सर्रास सुरू असून, यात संबंधित विभागाचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमन्याड नदीतून रात्री-बेरात्री केव्हाही उपसादिवसातून होतात चार-चार ट्रिपाएकीकडे पिण्यासाठी पाणी नाही अन् दुसरीकडे नदीपात्रात वाळूसाठी मोठमोठे खड्डे

अंधारी, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : अवैध वाळू उपसा मन्याड नदीतून रात्री व दिवसा सर्रास सुरू असून, यात संबंधित विभागाचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.मन्याड नदीपासून तमगव्हाण, अंधारी, पिंपळवाड, रोहिणी, हातगाव ही गावे मन्याड नदीच्या अगदी जवळच आल्याने वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे जोरात सुरू आहे. मात्र वाळूमाफीयांच्या दिवसातून चार ट्रिपा होतात. एका ट्रिपचे तीन हजार तर चार ट्रिपचे १२ हजार रुपये मिळतात. असे बरेच ट्रॅक्टर केव्हाही भरून जात असताना नजरेस पडत आहेत.एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, मात्र नदीला वाळूसाठी मोठेमोठे खड्डे पाडले जात आहेत. एवढेच नव्हे तर रात्री, पहाटे वाळूचे ट्रॅक्टर गावाजवळून इतक्या वेगात जातात की, सकाळी प्रसाधन गृहासाठी जाणारी वयोवृद्ध मंडळी व महिलांना या ट्रॅक्टर्सपासून रस्ता सोडून खाली उतरून जावे लागते. तरीही वाळू ट्रॅक्टर हळू चालत नाही. अशा या वाळूमाफियांच्या मागे मोठ्या पुढाऱ्यांचे हात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.