शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरला जाणारी अवैध दारु जळगाव स्टेशनवर पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:25 IST

तरुणाला अटक

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क व रेल्वे सुरक्षा बलाने मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता रेल्वे स्थानकावर रेल्वे  चंद्रपूरला जाणारी अवैध देशी दारु पकडली. गोण्यांमध्ये दारुच्या दीड हजार बाटल्या भरल्या होत्या. मोनू मदन जाट (२३, रा.कंजरवाडा, सिंधी कॉलनी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला आहे.चंद्रपूर हा दारुबंदी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात महाराष्टÑात व मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध दारु नेली जाते. चेन्नई एक्सप्रेसने जळगाव येथून देशी दारु नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी भरारी पथकाचे निरीक्षक संजय कोल्हे, जवान मुकेश पाटील, नितीन पाटील, नंदू पवार व विठ्ठल हटकर यांचे पथक रेल्वे स्थानकावर पाठविले. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जी.एम.घीले, कॉन्स्टेबल प्रमोद सांगळे, रिहाद अहमद व विक्रम वाघ यांच्या पथकाने सापळा रचून प्लॅटफॉर्म क्र. ५ वर मोनू जाट याला पकडले. त्याच्याजवळील गोण्यांची झडती घेतली असता त्यात देशी दारुच्या ९० मिलिच्या दीड हजार बाटल्या होत्या. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोनू याला अटक करुन माल जप्त केला. दरम्यान, गेल्या वर्षी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव स्थानकावर अवैध दारु व गांजा पकडला होता, तेव्हा देखील आरोपी हे कंजरवाड्यातीलच निष्पन्न झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव