लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पहिल्या व दुसऱ्या लाटेतही इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयाने आपली इमारत व वैद्यकीय सेवा देत कोरोनाच्या या संकटात लढण्यासाठी मोठा हातभार लावला असून त्यांचे यात मोठे योगदान असल्याचे गौरोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी काढले. इकरा महाविद्यालयात हर्बल इम्युनिटी सेंटरचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.
कोरोनापासून प्रतिबंधात्मक तसेच ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा रुग्णांसाठी या ठिकाणी युनानी औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुधवारपासून या ठिकाणी सकाळी ११ ते ५ मोफत तपासणी व औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्राचे जिल्हा शल्यचकित्सक डॉ. चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी ४ वाजता उद्धाटन करण्यात आले. यावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ. करीम सालार, सचिव गफ्फार मलिक, सदस्य डॉ. इक्बाल शहा, अमिन बादलीवाला, अ. मजीद जकेरीया, रेडक्रॅास रक्पेढीचे गनी मेमन, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा पाटील, हरून नदवी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. कुद्दूस, उपप्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा कोविड सेंटरचे डॉ. नरेश पाटील, डॉ. अझीम काझी, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. एजाज शहा, अफजल शेख, ॲड. शरीफ शेख आदी उपस्थित होते.
रुग्णांना मोफत काढा
एक महिन्यासाठी इकरा कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत काढा देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अध्यक्ष करीम सालार यांनी केली. या ठिकाणी ठेवण्या आलेल्या औषधी, त्यांचे फायदे, तपासणी व युनानी औषधोपचाराबाबत डॉ. शोएब शेख यांनी माहिती दिली. इकरा महाविद्यालयाच्या योगदानाबाबत उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या ठिकाणाहून हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचेही उपस्थितांनी सांगितले.