शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

अमळनेरात गृहमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच आयजींची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:06 PM

सव्वा तीन लाखाचा माल जप्त करून ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजुगार अड्ड्यांवर धाडीसव्वा तीन लाखांचा माल जप्त३६ जणांवर गुन्हे दाखल

अमळनेर : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आगमनाच्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी विशेष पथक नियुक्त करून शहरात पोलीस कॉलनीच्या शेजारीच सट्टा व मटका जुगारावर मोठी कारवाई करून गृहमंत्र्यांना सलामी दिली आहे. सुमारे सव्वा तीन लाखाचा माल जप्त करून ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस महानिरीक्षकांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, राजेंद्र सोनवणे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, सुरेंद्र टोंगरे, अमोल भामरे यांचे पथक तयार केले. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावर अमळनेरला पाठवले आणि जुने पोलीस निवासस्थान व बसस्थानक यांच्या मधल्या गांधीनगर नावाच्या गल्लीत संताजी सोडा सेंटर वर छापा टाकला. तेथे अजय चौधरी, विनोद पाटील, विश्वास पाटील, मोहन सैंदाने ,दिनेश चौधरी, नारायण कोळी, शैलेश बाविस्कर, दीपक कोळी, विजय बडगुजर, वसंत कोळी हे सट्टा जुगार खेळताना, आकडे लिहिताना आढळून आल. त्यांच्याजवळून दोन मोटारसायकलींसह ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तेथूनच अगदी थोड्या अंतरावर हॉटेल सुयश जवळ एक ठिकाणी हिरामण सोनू ठाकरे , राहुल शिंगाणे , बापू भोई ,दत्तात्रय वारुळे , संजय निकम, रमेश अहिरे हेदेखील सट्टा जुगार खेळताना तसेच आकडे लिहिताना आढळून आल. त्यांच्याजवळून एक मोटारसायकल व ६९ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आह. त्याचप्रमाणे याच पथकाने आठवडे बाजारात लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येदेखील छापा टाकला. भूषण चौगुले, संजय सूर्यवंशी, दिवाकर ठाकूर, धनराज कोळी, सुखदेव ठाकूर, मोतीराम कलोसे, जयसिंग वंजारी, आत्माराम बागुल, मुकेश भिल, इब्राहिम मेवती, प्रकाश मोरे, रवींद्र पवार, रवींद्र अहिरे, विनायक पाटील, झाकीर पठाण, श्याम परदेशी, अशोक अहिरे, रामकृष्ण पाटील, मल्हारी कोळी, वासुदेव पाथरवड हेदेखील सट्टा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याजवलील चार मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ६६ हजार ४३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. एकूण तीन लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून ३६ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वाना अटक करण्यात आल. गृहमंत्री येणार असताना भर बाजारात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाशेजारील गल्लीत मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे आढळून आल्याने शहरात जोरदार चर्चा होती