शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 11:58 IST

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच ...

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजय घेंगट यांनी आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मनपा मालकीच्या अनेक जागांचे गैरव्यवहार होत असल्याचे या पत्रात म्हटले होते. तसेच या प्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता या फाईली गायब झाल्याचे आढळून आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराबाबत मनपा प्रशासन कोणतीही वाच्यता करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनपाच्या जागांचे गैरव्यहार होत आहेत तर दुसरीकडे कोट्यवधींच्या या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने अनेकवेळा काही जणांकडून या जागेचे ताबा घेण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात घरकुल योजना सुरू केली होती. त्यातील अनेक योजनांच्या बांधलेल्या घरकुलांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. अर्धवट बांधलेल्या या घरकुलांचे सांगडे तसेच पडून आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मालमत्तांच्या सुरक्षेसाठीदेखील प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने या बांधकामांची मोडतोड करण्यात आली आहे. सम्राट कॉलनी व महादेव मंदिरासमोरील घरकुलांमध्ये अक्षरश: म्हशी बांधण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महापालिकेने राबविलेल्या अपूर्णावस्थेतील घरकुल योजनांच्या जमिनी म्हाडाला देवून त्यातून उत्पन्न मिळविण्याच्या पर्यायाचा विचार प्रशासनाचाहोता. याबाबत महासभेत ठरावदेखील करण्यात आला. म्हाडानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही होत नसल्याने तोही प्रस्ताव रखडला आहे. मनपाच्याच मालकीची असलेली जागा आज धूळ खात पडून असून, याकडे सुस्त प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात मनपा मालकीच्या सुमारे १०० कोटीच्यावर अधिक भाव असलेल्या मालमत्ता आहेत. या जागांचा उपयोग केल्यास मनपाला आर्थिक फायदा देखील होवू शकतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव